Photo Credit: Reliance Jio
Reliance Jio कडून 21 देशांसाठी International Subscriber Dialing (ISD) recharge plans शुक्रवारी (11 ऑक्टोबर) जारी करण्यात आले आहेत. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कडून नवे minute packs देण्यात आले आहेत हे नवे ISD recharge plans 39 रूपयांपासून सुरू झाले आहेत आणि 99 रूपयांपर्यंत ते उपलब्ध आहेत. हे प्लॅन्स प्रीपेड आणि पोस्ट पेड अशा दोन्ही सब्सस्क्रायबर्स साठी आहेत. नव्या पॅक सोबत कंपनीने काही इंटरनॅशनल लोकेशन साठी pay-as-you-go packs देखील जारी केले आहेत. आता हे नव्याने जारी केलेले दर आणि new minute packs सार्या युजर्स साठी उपलब्ध आहेत.
प्रेस रीलीज मध्ये जारी माहितीनुसार, Minute packs हे सब्सस्क्रायबर्सना काही विशिष्टon-call minutes देतात. हे pay-as-you-go recharge plans पेक्षा वेगळे आहेत. pay-as-you-go recharge plans मध्ये युजर्सना पॅक विकत घ्यावा लागतो आणि त्यानंतर ISD calls ला स्पेशल रेट दिला जातो. यामध्ये मिनिटांचं काही बंधन नाही. हा प्लॅन अशा लोकांना फायद्याचा आहे ज्यांना इंटरनॅशनल स्तरावर शॉर्ट कॉल करायचे आहेत पण त्यासाठी फार पैसे खर्च करायचे नाहीत.
नवे Reliance Jio minute packs हे 39 रूपयांपासून सुरू होतात. अमेरिका, कॅनडा मध्ये कॉल करण्यासाठी हे प्लॅन आहेत. या पॅक मध्ये 30 मिनिटांचा कॉल टाईम मिळतो. बांग्लादेशचा minute pack हा 49 रूपयांचा आहे त्यामध्ये कॉलिंग साठी 20 मिनिटांचा वेळ मिळतो. Singapore, Thailand, Hong Kong, आणि Malaysia मध्ये कॉल करण्यासाठी सब्सस्क्रायबर्सना 49 रूपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये त्यांना बोलण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.
Australia आणि New Zealand साठी minute pack हा 69 रूपयांचा असणार आहे. यामध्ये बोलण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. UK, Germany, France, आणि Spain मध्ये बोलण्यासाठी सब्सस्क्रायबर्सना 79 रूपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. त्यामध्ये बोलण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ मिळेल. 89 रूपयांच्या प्लॅन मध्ये China, Japan, आणि Bhutan मधील सेवा मिळणार आहे. ज्यात बोलण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ असणार आहे. UAE, Saudi Arabia, Turkey, Kuwait,आणि Bahrain मधील कॉल साठी 99 रूपये खर्च करावे लागतील त्यामध्ये बोलण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ असेल.
दरम्यान हे टार्गेटेड रिचार्ज प्लॅन्स हे युजर्सला केवळ त्याच भागात मदत करतील ज्या भागात त्यांनी प्लॅन घेतला आहे. हे हायब्रीड प्लॅन्स जिओ च्या प्रीपेड आणि पोस्ट पेड मोबाईल सब्सस्क्राईबर्सना उपलब्ध असतील. यामध्ये युजर्सना प्लॅन किती वेळेस रिचार्ज करायचा यावर कोणतेही बंधन नसेल. रिचार्ज च्या दिवसापासून 7 दिवस पुढे हा पॅक व्हॅलिड असणार आहे.
जाहिरात
जाहिरात