Photo Credit: Reuters
ग्राहक रिलायन्स जिओ स्टोअरमध्ये स्टारलिंक उपकरणे खरेदी करू शकतील, असे कंपनीचे म्हणणे आहे.
Jio कडून SpaceX सोबत भागीदारी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून Starlink broadband services भारतात दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Reliance Industries कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Elon Musk च्या मालकीच्या कंपनी सोबत करार करून रिलायंस जिओ भारतात वेगवान इंटरनेट सेवा देणार आहे. ही सेवा low-Earth orbit satellites द्वारा दिली जाईल . त्यामुळे भारतातील दुर्गम भागात इंटरनेट सेवा मिळणार आहे. Starlink equipment हे Reliance Jio stores मध्ये खरेदी करता येईल. मात्र त्यासाठी अद्याप SpaceX ला सरकारी यंत्रणांकडून परवानगी मिळणं बाकी आहे.
Reliance Jio-Starlink पार्टनरशीप बद्दल प्रेस रीलीज मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्टारलिंकची सेवा आणली तरीही ती JioAirFiber आणि JioFiber ची सेवा देखील सुरू राहणार आहे. दुर्गम भागामध्ये इंटरनेट पोहचवणं हे या पार्टनरशीपमुळे शक्य होणार आहे. हाय स्पीड इंटरनेट हा केवळ इंटरप्राईजेस पुरता मर्यादित न ठेवता तो लहान आणि मध्यम व्यवसाय आणि समुदयापर्यंत देखील पोहचवता येणार आहे.
Regulatory Authorities कडून परवानगी मिळाल्यानंतर ग्राहकांना Starlink equipment हे Reliance Jio stores मधून खरेदी करता येईल. नंतर कंपनी ग्राहकांना इंस्टॉलेशन आणि अॅक्टिव्हेशन सर्व्हिस देईल.
President and Chief Operating Officer of SpaceX यांनी पार्टनरशीपच्या घोषणेनंतर दिलेल्या माहितीमध्ये "आम्ही जिओ सोबत भारतात अधिकाधिक लोकांना आणि व्यावसायिकांना स्टारलिंकची हाय स्पीड इंटरनेट सर्व्हिस देण्यास उत्सुक आहोत".
भारताची डिजिटल इकोसिस्टम पुढे नेण्यासाठी दोन्ही कंपनींकडे एकमेकांना पुरक भागांमध्ये विकास करण्याचा विचार केला जाईल. त्यासाठी त्यांच्या इंफ्रास्ट्रक्चरचा फायदा घेतला जाईल. स्टारलिंक्स कडे 7000 अॅक्टिव्ह satellites आहेत जे low-latency broadband services देतील.
इलॉन मस्कच्या कंपनीने भारतात अशाप्रकारे वेगवान इंटरनेट देण्यासाठी एअरटेल नंतर जिओ ची निवड केली आहे. एअरटेल कडून भारतात स्टारलिंक सर्व्हिसेस ही बिझनेस कस्टमर्स, कम्युनिटीज, शाळा आणि हेल्थ सेंटर्स मध्ये दिली जाईल.
जाहिरात
जाहिरात