Apple Watch Series 11, Watch Ultra 3, आणि Watch SE 3 हे 19 सप्टेंबरपासून विक्रीसाठी खुले होणार आहेत.
Photo Credit: Apple
अॅपल वॉच सिरीज ११ ही टेक जायंटची नवीनतम स्मार्टवॉच आहे
Apple ने ‘Awe Dropping' लाँच इव्हेंटमध्ये Apple Watch Series 11, Watch Ultra 3 आणि Watch SE 3 देखील बाजारात आणला आहे. सोबत iPhone 17 सीरिजही लाँच केली आहे. ज्यामध्ये iPhone 17, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांचा समावेश आहे. यामध्ये Watch SE सीरिजला तब्बल तीन वर्षांनी अपडेट करण्यात आले असून, Watch SE (2nd Generation) सप्टेंबर 2022 नंतरचा हा नवा मॉडेल आहे.
Apple Watch Series 11 ची किंमत $399 (सुमारे ₹35,000) पासून सुरू होते, तर भारतात याची सुरुवातीची किंमत ₹46,900 आहे. हे 42mm आणि 46mm अशा दोन साइजमध्ये उपलब्ध असून Jet Black, Rose Gold, Silver आणि Space Grey अशा अॅल्युमिनियम केस पर्यायांसह मिळते. नैसर्गिक, गोल्ड आणि स्लेट कलरमध्ये पॉलिश्ड टायटॅनियम केस ऑप्शनही असेल. Apple Watch Ultra ची किंमत अमेरिकेत $799 ( 71,000 रूपये) पासून सुरू होते. हा फ्लॅगशिप स्मार्टवॉच Natural आणि Black Titanium केस पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. Watch Ultra 3 साठी कंपनीने नवीन स्ट्रॅप कलर पर्याय सादर केले आहे. Apple Watch SE 3 ची भारतातील किंमत ₹25,900 पासून सुरू होते, तर अमेरिकेत याची सुरुवातीची किंमत $249 (सुमारे ₹22,000) आहे. हे स्मार्टवॉच Midnight आणि Starlight अशा अॅल्युमिनियम केस पर्यायांसह उपलब्ध होईल.
Apple Watch Series 11 हा 5G-सक्षम स्मार्टवॉच असून तो WatchOS 26 वर चालतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यात फ्रंटवर दोनपट जास्त स्क्रॅच-रेसिस्टंट ग्लास आहे. या डिस्प्लेसाठी खास Ion-X ग्लास वापरला असून त्यावर नवीन सिरेमिक कोटिंग केले आहे, जे “physical vapour deposition” प्रक्रियेद्वारे ग्लासला अॅटोमिक लेव्हलवर बांधले गेले आहे.
Apple Watch Ultra 3 आता 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. यात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आकाराचा डिस्प्ले असून Always-on Display आणि 1Hz रिफ्रेश रेटची सुविधा आहे. या घड्याळात LTPO3 वाइड-अँगल OLED स्क्रीन दिली आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या कोनातून कंटेंट स्पष्ट दिसतो. तसेच LTPO3 तंत्रज्ञानामुळे डिस्प्लेचे बेझल्स 24% स्लीम आहेत, ज्यामुळे केसचा आकार न वाढवता अधिक मोठा “active screen area” उपलब्ध होतो.
Apple Watch SE 3 मध्ये Watch Series 11 आणि Watch Ultra 3 प्रमाणेच 5G कनेक्टिव्हिटी, नवीन स्लीप स्कोर सिस्टम आणि ऑन-डिव्हाइस सिरीची सुविधा आहे. आता हा किफायतशीर स्मार्टवॉचसुद्धा अल्वेज-ऑन डिस्प्लेसह उपलब्ध आहे.
जाहिरात
जाहिरात