Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये Fastrack, Boat, Noise, Imoo, Sekyo आणि इतर ब्रँड्सच्या GPS ट्रॅकिंगसह येणार्या मुलांसाठीच्या विविध स्मार्टवॉचवर दमदार सूट आहे.
Photo Credit: Noise
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५ मध्ये नॉइजकडून मुलांसाठी स्मार्टवॉचवर सर्वोत्तम डील मिळत आहेत
Amazon Great Indian Festival Sale 2025 ची यंदा दमदार सुरूवात झाली आहे. हा सेल सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांताच सुमारे 38 कोटी भारतीय ग्राहकांनी सेल मध्ये भेट दिली आहे. सध्या या सेलचा दुसरा आठवडा आहे. 23 सप्टेंबरच्या रात्री हा सेल सर्व भारतीय ग्राहकांसाठी खुला झाला आहे. अमेझॉन कडून या वार्षिक आणि बहुप्रतिक्षित सेल मध्ये सार्याच प्रोडक्ट्स वर दमदार सूट दिली आहे. त्यामध्ये नेहमीच्या वापरातील वस्तूंपासून अगदी इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे स्मार्ट टीव्ही, TWS हेडसेट्स, होम अप्लायंसेस, वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्ही, पीसी, लॅपटॉप्स यांचा समावेश आहे.
तुमच्या लहान मुलांना जर तुम्ही स्मार्टवॉच घेण्याच्या विचारात असाल तर हा सेल त्याच्या खरेदीची उत्तम संधी आहे. मुलांच्या सुरक्षेवर या वॉचच्या मदतीने तुम्ही लक्ष देखील ठेवू शकता. अमेझॉन कडून या सेल मध्ये अनेक स्मार्टवॉचेस वर सूट जाहीर केली आहे सोबतच एक्सचेंज बोनस, कॅशबॅक ऑफर्स, इंटरेस्ट फ्री ईएमआय यांचेही पर्याय दिले आहेत. या मध्ये काही बॅंक ऑफर्स देखील आहेत. ज्यात SBI credit आणि debit card वापरून 10% instant discount म्हणजे 1500 रूपयांपर्यंत सूट मिळवू शकता. ग्राहक लहान मुलांच्या स्मार्टवॉच खरेदीवर सुमारे 9500 रूपयांपर्यंत सूट मिळवू शकता.
सध्या सुरू असलेल्या Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये पालकांना मिळू शकणाऱ्या Fastrack, Boat, Noise, Imoo, Sekyo आणि इतर ब्रँड्सच्या GPS ट्रॅकिंगसह मुलांसाठी च्या स्मार्टवॉचवरील सर्वोत्तम ऑफर्सची यादी येथे दिली आहे. खाली नमूद केलेल्या किमतींमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील अतिरिक्त बँक सवलती, कॅशबॅक ऑफर आणि एक्सचेंज बोनस समाविष्ट नाहीत. त्यामुळे तुम्ही या ऑफर्सचा समावेश करून अधिकचा फायदा घेत पैसे वाचवू शकता.
मॉडेल | लिस्ट प्राईज | सेल प्राईज |
Noise Scout | Rs. 7,999 | Rs. 4,999 |
Noise Explorer | Rs. 9,999 | Rs. 5,999 |
Fastrack Volt S1 | Rs. 2,995 | Rs. 1,498 |
Boat Wanderer | Rs. 14,999 | Rs. 5,499 |
Sekyo S2 Pro | Rs. 3,999 | Rs. 2,599 |
Sekyo 'Carepal Pro' | Rs. 6,999 | Rs. 4,690 |
GameSir Kids Smartwatch | Rs. 4,999 | Rs. 1,271 |
Imoo Watch Phone Z1 | Rs. 12,990 | Rs. 8,490 |
जाहिरात
जाहिरात