BoAt Airdopes ProGear फक्त 10 मिनिट चार्ज करा आणि 10 तास वापरा.

BoAt Airdopes ProGear फक्त 10 मिनिट चार्ज करा आणि 10 तास वापरा.
महत्वाचे मुद्दे
  • BoAt Airdopes ProGear ला मिळाली आहे, IPX5 रेटिंग.
  • हे इअरफोन्स कान आणि त्वचेसाठी अनुकूल असणाऱ्या सामग्रीने बनवले आहेत.
  • BoAt Airdopes ProGear च्या केसमध्ये मिळते 500 mAh ची बॅटरी.
जाहिरात
खरं सांगायचं झालं तर जास्त प्लेबॅक वेळ देणारा इअरफोन हा कानांसाठी चांगला नसला तरी त्याला सतत चार्ज करणे हे आपल्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत त्रासदायक ठरते. म्हणूनच कदाचित आपल्या ह्या त्रासाची चिंता आपल्यापेक्षा इअरफोन्स बनविणारी कंपनी घेते, त्यासाठीच boAt घेऊन आला आहे, BoAt Airdopes ProGear. आपण प्रत्येक वेळी कंपनीकडून ही अपेक्षा नाही ठेऊ शकत की ते त्यांच्या नवीन प्रॉडक्ट सोबत काहीतरी बदल घडवतील, पण आपल्या वापरकर्त्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत काय द्यावे ह्याची काळजी boAt नेहमीच घेते. 

म्हणूनच कंपनीने त्यांच्या जुन्या डिझाइनला निरोप देऊन सिलिकॉन टिप्स सोबत इअरफोन्स बनवले आहेत. ही एक प्रकारची ओपन एअर डिझाइन आहे. जीची पकड घट्ट असून ती कानाला स्थिरता तर देते पण वापरकर्त्याला एका चांगल्या ध्वनी गुणवत्तेबाबत सभोवतालच्या परिस्थितीबाबत सुद्धा जागरूक ठेवते. हे इअरफोन्स नेहमीपेक्षा जरा जास्तच वेगळे आहेत. चला तर मग, आपण पाहुयात काय आहेत BoAt Airdopes ProGear ची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता.

BoAt Airdopes ProGear ची वैशिष्ट्ये.

वर दिलेल्या फोटोकडे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, की BoAt Airdopes ProGear हा बाकीच्या इअरफोन्स पेक्षा नक्कीच वेगळा दिसत आहे. त्याच्या डिझाइन पलीकडे कंपनीने अनेक बदल केले आहेत, ज्यामध्ये OWS Airdopes हे Quad Mic AI ENx ह्या तंत्रज्ञानासह बनविण्यात आले आहेत. ह्यामध्ये चार मायक्रोफोन्स बसवले आहेत जे AI च्या मदतीने बाहेरील आवाज प्रभावीपणे दूर करतात. ह्यामध्ये अधिक खोल आणि चांगल्या ऑडियो गुणवत्तेसाठी 15 मिमीचे ड्रायव्हर्स सुसज्ज आहेत. 

BoAt Airdopes ProGear ला अल्ट्रा-लो लेटन्सी मोड ने अखंड कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.3 सोबत BEAST मोड जोडण्यात आला आहे, ज्यामुळे तुमचा गेमिंग आणि विडियोचा अनुभव अधिक सुखद बनतो. ह्यामधील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये ते म्हणजे बॅटरी. ह्या दोन्ही इअरफोन्समध्ये 65 mAh ची बॅटरी बसविण्यात आली आहे, त्याशिवाय चार्जिंग केस मध्ये 500 mAh ची बॅटरी बसविण्यात आली आहे, जी 100 तासांपर्यंत आरामात चालते. त्याशिवाय ह्या BoAt Airdopes ProGear ला फक्त 10 मिनिट चार्ज केल्यानंतर ते 10 तास आरामात चालू शकतात. 

BoAt Airdopes ProGear किंमत आणि उपलब्धता. 

BoAt Airdopes ProGear हे काळया आणि हिरव्या ह्या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहेत. जे तुम्हाला भारतात Amazon, Myntra आणि boAt च्या अधिकृत वेबसाइट वर 1,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ज्यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल तुम्हाला वेबसाईटवर आवश्यक माहिती मिळेल. पण हेच BoAt Airdopes ProGear तुम्हाला Flipcart वर फक्त 1,699 मध्ये खरेदी करता येतील.
Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »