HUAWEI Watch GT 6 Pro मध्ये 1.47-inch AMOLED display आहे ज्यात 466 × 466 रिझोल्युशन आणि 317 PPI चा समावेश आहे.
Photo Credit: Huawei
Huawei Sunflower GPS ट्रेल रनिंग, हायकिंग आणि सायकलिंगसाठी लोकेशन अचूकता वाढवते
HUAWEI कडून त्यांची नवी स्मार्टवॉचेस Watch GT 6 आणि Watch GT 6 Pro ही भारतात लॉन्च करण्यात आली आहेत. या स्मार्टवॉचमध्ये प्रिमियम डिझाईन, अत्याधुनिक हेल्थ ट्रॅकिंग आणि मजबूत बॅटरी परफॉर्ममन्सचा समावेश आहे. दोन आकाराचे पर्याय, AMOLED डिस्प्ले आणि मजबूत टिकाऊपणा रेटिंगसह, पहा या नवीन HUAWEI Watch GT 6 सीरीजची किंमत आणि संपूर्ण फीचर्स काय?HUAWEI Watch GT 6 Pro ची स्पेसिफिकेशन्स,HUAWEI Watch GT 6 Pro मध्ये 1.47-inch AMOLED display आहे ज्यात 466 × 466 रिझोल्युशन आणि 317 PPI चा समावेश आहे. single 46mm variant हे stainless steel case सोबत येणार असून ते rotating crown आणि साईड बटण सह असेल. या स्मार्टवॉचमध्ये accelerometer, gyroscope, magnetometer, हार्ट रेट मॉनिटर, बॅरोमीटर, तापमान सेन्सर, ambient light sensor आणि ईसीजी असे प्रगत सेन्सर आहेत. हे NFC, Bluetooth 6.0, Android 9.0+, आणि iOS 13.0+ला सपोर्ट करते.
standard GT 6 दोन आकारात येते. 46 mm व्हेरिएंटमध्ये 317 PPI असलेला 1.47 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, तर 41 mm मॉडेलमध्ये 352 PPI असलेला 1.32 इंचाचा AMOLED स्क्रीन आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये होम बटण (रोटेटिंग क्राउन) आणि साइड बटण असलेले स्टेनलेस स्टील केस आहे. सेन्सर सपोर्टमध्ये अॅक्सिलरोमीटर, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर, हार्ट रेट मॉनिटर, बॅरोमीटर, तापमान सेन्सर आणि अॅम्बियंट लाइट सेन्सर समाविष्ट आहेत. कनेक्टिव्हिटी NFC आणि Bluetooth 6.0 द्वारे हाताळली जाते. 46 mm मॉडेलसाठी बॅटरी लाइफ 21 दिवसांपर्यंत (सामान्य) जाते, तर लहान 41 mm मॉडेल 14 दिवसांपर्यंत देते.
HUAWEI Watch GT 6 चा 46 mm व्हेरिएंट रू21,999 मध्ये उपलब्ध असून तो हिरवा, करडा आणि काळा या रंगांमध्ये येतो. 41 mm मॉडेलची किंमत काळा, पांढरा, जांभळा आणि तपकिरी रंगांसाठी रू21,999 आहे. गोल्ड व्हेरियंटची किंमत रू24,999 आहे. प्रीमियम HUAWEI Watch GT 6 Pro चे दोन पर्याय सादर केले आहेत. काळा आणि तपकिरी रंगातील मॉडेल रू28,999 मध्ये मिळेल, तर टायटॅनियम व्हेरियंटची किंमत रू39,999 आहे
जाहिरात
जाहिरात