OPPO वॉच S मध्ये स्टेनलेस-स्टील केसिंग, location accuracy साठी ड्युअल-फ्रिक्वेन्सी GPS आणि voice guidance, fat-burning analysis देणारा आहे.
Photo Credit: Oppo
OPPO Watch S सिल्व्हर/ब्लॅक CNY 1299, ड्युअल-टोन ग्रीन CNY 1499 किंमत आहे
Find X9 series सोबतच OPPO कडून Watch S ची घोषणा झाली आहे. ओप्पो ने जाहीर केलेल्या या नव्या स्मार्टवॉच मध्ये stylish round-dial ultra-slim design आहे. 8.9 mm जाडीचं आणि 35 ग्राम वजनाचं हे घड्याळ आहे. या घडाळ्यामध्ये अचूकतेसाठी पूर्णपणे नवीन 16 चॅनेल optical pulse oximeter आणि 8-channel optical heart rate sensor आहेत. OPPO वॉच S मध्ये स्टेनलेस-स्टील केसिंग, location accuracy साठी ड्युअल-फ्रिक्वेन्सी GPS आणि voice guidance, fat-burning analysis देणारा AI स्पोर्ट्स कोच देखील आहे. यासोबतच त्यात वन क्लिक health inspection चा समावेश आहे जी ईसीजी, हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन, मनगटाचे तापमान, झोप आणि ताण यासह 13 निर्देशकांचे मोजमाप करते आणि 60 सेकंदांत झटपट विश्लेषण देते.
OPPO Watch S चा डिस्प्ले हा 1.46″ (464 x 464 pixels) AMOLED screen, 1500 nits peak brightness चा आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्स आहेत. Android 10 किंवा त्याच्यावरील आणि iOS 14 व त्याच्यावरील डिव्हाईज सोबत ते सुसंगत आहे. OPPO Watch S ला 5ATM + IP68 रेटिंग असल्याने ते धूळ, पाण्यापासून सुरक्षित आहे. या स्मार्टवॉचमध्ये NFC, Bluetooth 5.2, L1+L5 Beidou, GPS, GLONASS, QZSS चा समावेश आहे. या घडाळ्यामध्ये 330mAh / 339mAh बॅटरीचा समावेश असून 10 दिवसापर्यंत त्याचे बॅटरी लाईफ आहे. हे स्मार्टवॉच सुमारे 90 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. ओप्पोने दिलेल्या माहितीनुसार, 10 मिनिटे चार्जिंग केलं तर Watch S 24 तासांपर्यंत काम करू शकतं. नियमित वापरासह, OPPO Watch S सात दिवसांचा बॅटरी बॅकअप देईल आणि नेहमी-चालू डिस्प्ले फीचरसह चार दिवसांचा बॅटरी बॅकअप देईल. हे स्मार्टवॉच Vibrant Green, Rhythmic Silver, Racing Black अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान हे स्मार्टवॉच BES2800BP चिपसेटद्वारे पॉवर्ड आहे, 4GB EMMC मेमरीसह जोडलेले आहे.
OPPO Watch S ची किंमत सिल्व्हर आणि ब्लॅक व्हेरिएंटसाठी CNY 1299(USD 182 / 16,030 रूपये अंदाजे) आहे, तर ड्युअल-टोन ग्रीन व्हेरिएंटची किंमत CNY 1499 (USD 210 / 18498 रूपये अंदाजे) आहे. स्मार्टवॉचसाठी प्री-ऑर्डर आधीच सुरू झाल्या आहेत. ओप्पोचं हे स्मार्टवॉच 22 ऑक्टोबर ला विक्रीसाठी उपलब्ध होईल.
जाहिरात
जाहिरात
Engineers Turn Lobster Shells Into Robot Parts That Lift, Grip and Swim
Strongest Solar Flare of 2025 Sends High-Energy Radiation Rushing Toward Earth
Raat Akeli Hai: The Bansal Murders OTT Release: When, Where to Watch the Nawazuddin Siddiqui Murder Mystery
Bison Kaalamaadan Is Now Streaming: Know All About the Tamil Sports Action Drama