स्मार्ट ग्लासेस एकदा चार्ज केल्यावर चार तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतात आणि चार्जिंग केससह अतिरिक्त 32 तास देतात.
Photo Credit: Amazon
Ray-Ban Meta Glasses विविध फ्रेम आणि लेन्स पर्यायांसह उपलब्ध आहेत
Ray-Ban Meta Glasses आता भारतामध्ये ई कॉमर्स वेबसाईट वर विक्रीसाठी खुला झाला आहे. EssilorLuxottica यांच्या सहकार्याने विकसित केलेले, स्मार्ट ग्लासेस मे महिन्यात देशात सादर करण्यात आले होते, परंतु ते फक्त Ray-Ban.com आणि भारतातील आघाडीच्या ऑप्टिकल आणि सनग्लास स्टोअर्समधूनच खरेदी करता येत होते.Ray-Ban Meta Glasses 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, ओपन-इअर स्पीकर्स आणि मायक्रोफोनसह सुसज्ज आहेत, जे यूजर्सना स्नॅपशॉट/व्हिडिओ कॅप्चर करण्यास, गाणी ऐकण्यास आणि संभाषण करण्यास सक्षम करतात.
Ray-Ban Meta Glasses ची भारतातील किंमत 29,900 रूपयांपासून सुरू होते. यामध्ये Skyler आणि Wayfarer डिझाईनचा समावेश आहे. हा Shiny Black रंगामध्ये उपलब्ध आहे. सध्या हे स्मार्ट ग्लासेस 20% सवलतीच्या आणि बॅंक ऑफर्स मध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर त्याची किंमत Rs. 23,920 आहे. ग्राहक विविध प्रकारच्या फ्रेम शैलींमधून आणि प्रिस्क्रिप्शन, सन, पोलराइज्ड आणि ट्रान्झिशन्स लेन्समधून निवडू शकतात.
देशातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ते सादर करण्याच्या कंपनीच्या योजनेचा एक भाग म्हणून Amazon, Flipkart आणि Reliance Digital द्वारे Ray-Ban Meta Glasses खरेदी करू शकतात.
Ray-Ban Meta Glasses मध्ये 12 मेगापिक्सेल कॅमेरा आणि फ्रेमच्या दोन्ही बाजूला दोन वर्तुळाकार आकाराच्या कटआउट्समध्ये एक एलईडी लाईट आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग लाईव्ह असताना एलईडी लाईट रेकॉर्डिंग इंडिकेटर म्हणून काम करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट ग्लासेस 3,024 x 4,032 pixels पर्यंतच्या रिझोल्यूशनवर फोटो कॅप्चर करू शकतात आणि 60 सेकंदांपर्यंत 1080p व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात.
मेटा म्हणते की डिव्हाइससह रेकॉर्ड केलेले व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या मेटा अॅप्सवर शेअर केले जाऊ शकतात. यूजर्स मेटा व्ह्यू अॅपचा वापर करून ते इतर प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Ray-Ban Meta Glasses त्यांच्या मालकीच्या मेटा एआय असिस्टंटचा वापर करतात. यूजर्स विविध हँड्स-फ्री अॅक्शन टॉगल करण्यासाठी "हे मेटा एआय" व्हॉइस प्रॉम्प्ट म्हणू शकतात. स्मार्ट ग्लासेस इंग्रजी आणि स्पॅनिश, फ्रेंच किंवा इटालियनमध्ये रिअल-टाइम स्पीच ट्रान्सलेशन क्षमता देखील देतात, ज्यामध्ये साध्या "हे मेटा, लाइव्ह ट्रान्सलेशन सुरू करा" चा वापर केला जातो. भाषांतरित ऑडिओ ओपन-इअर स्पीकर्सद्वारे प्ले केला जातो, तर त्याचे ट्रान्सक्रिप्शन मिळविण्याचा पर्याय देखील असतो.
Ray-Ban Meta Glasses Qualcomm च्या Snapdragon AR1 Gen1 Platform SoC ने सपोर्टेड आहेत आणि 32GB ऑनबोर्ड स्टोरेज पॅक करतात. स्मार्ट ग्लासेस एकदा चार्ज केल्यावर चार तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतात आणि चार्जिंग केससह अतिरिक्त 32 तास देतात.
जाहिरात
जाहिरात
Instagram Expands Meta AI Translations to New Languages, Rolls Out New Indian Fonts on Edits App