Redmi Watch 6 हे स्मार्टवॉच ब्लू मून सिल्व्हर, एलिगंट ब्लॅक आणि मिस्टी ब्लू रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Photo Credit: Redmi
रेडमी वॉच ६ ब्राइट मून सिल्व्हर, एलिगंट ब्लॅक आणि मिस्टी ब्लू रंगांमध्ये विकला जातो
Redmi Watch 6 हे अपग्रेडेड डिझाईन आणि अधिक खास स्पेसिफिकेशन सह येणार आहे. यामध्ये 2.07-inch AMOLED colour display चा समावेश असून त्यामध्ये 432×514 pixel resolution चा समावेश आहे. यामध्ये 82% screen-to-body ratio चा समावेश आहे. तसेच यामध्ये 2000 nits peak brightness आहे. 60 Hz refresh rate आणि Always-On Display (AOD) कॅपॅबिलिटी आहे. त्याचा डिस्प्ले 2.5D curved glass cap आणि यूजर्स पोर्ट्रेट कस्टमायझेशनसह अनेक वॉच फेस निवडू शकतात. Redmi Watch 6 मध्ये 9.9mm स्लिम अॅल्युमिनियम अलॉय फ्रेम आहे ज्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा क्राऊन आणि फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमर बॅक कव्हर आहे. हे कस्टम AI-generated वॉच फेसला सपोर्ट करते आणि क्विक-रिलीज स्ट्रॅप डिझाइनसह येते, ज्यामुळे यूजर्स सहजपणे बँड स्विच करू शकतात. स्ट्रॅपशिवाय हे घड्याळ 31 ग्रॅम वजनाचे आहे आणि 135 मिमी ते 205 मिमी पर्यंतच्या मनगटाच्या आकारात बसते.
Redmi Watch 6 मध्ये Xiaomi Surge OS 3 चा सपोर्ट आहे आणि सुपर आयलंड इंटरफेस आहे, जो फ्लुइड परफॉर्मन्स आणि सुधारित डिव्हाइस कनेक्टिव्हिटी देतो. कन्व्हर्ज्ड डिव्हाइस सेंटरसह, घड्याळातून इतर स्मार्ट डिव्हाइसेस आणि अगदी ऑटोमोबाईल्स देखील नियंत्रित करणे शक्य आहे. घड्याळात WeChat क्विक रिप्लाय, व्हॉइस रिप्लाय आणि इमोटिकॉनसाठी देखील सपोर्ट आहे, ज्यामुळे डिव्हाइस प्रवास करताना communication tool म्हणून वापरण्यास सोयीस्कर बनते.
Redmi Watch 6 मध्ये 150 हून अधिक स्पोर्ट मोड्स आहेत, त्यापैकी सहा ऑटो-डिटेक्ट आहेत. यामध्ये मल्टी-डायमेंशनल हेल्थ ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सिजन (SpO2), स्लीप आणि स्ट्रेस ट्रॅकिंग आहे. स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर, जायरोस्कोप, अॅक्सिलरोमीटर, अॅम्बियंट लाईट सेन्सर आणि जिओमॅग्नेटिक सेन्सर यांचा समावेश आहे.
Redmi Watch 6 स्मार्टवॉचला 550mAh बॅटरीचा आधार आहे आणि वॉच 6 नियमित वापरासह 12 दिवसांपर्यंत किंवा बॅटरी-सेव्हर मोडमध्ये 24 दिवसांपर्यंत चालू शकतं. हे ब्लूटूथ 5.4, NFC आणि पोहण्यासाठी आणि दररोजच्या वापरासाठी 5 ATM वॉटर रेझिस्टन्सला सपोर्ट करते. या स्मार्टवॉचची किंमत CNY 599 म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये अंदाजे सुमारे 7400 रुपये आहे आणि ती Xiaomi च्या China e-store ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदी करता येणार आहे. तसेच हे स्मार्टवॉच ब्लू मून सिल्व्हर, एलिगंट ब्लॅक आणि मिस्टी ब्लू रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
भारतीय बाजारपेठेत या Redmi Watch 6 स्मार्टवॉचच्या लाँचिंगबद्दल अद्याप कोणतीही चर्चा नाही, परंतू ते या वर्षी डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या आसपास दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जाहिरात
जाहिरात
Kepler and TESS Discoveries Help Astronomers Confirm Over 6,000 Exoplanets Orbiting Other Stars
Rocket Lab Clears Final Tests for New 'Hungry Hippo' Fairing on Neutron Rocket