अनेक डेंटिस्ट दातांच्या आरोग्यासाठी 2 मिनिटं प्रत्येक ठिकाणी ब्रश करण्याचा सल्ला देतात.
Photo Credit: Xiaomi
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५ ला पहिल्या ४८ तासांत ३.८ कोटी भेटी मिळाल्या
Amazon Great Indian Festival Sale 2025 भारतामध्ये 23 सप्टेंबर पासून सुरू झाला आहे. यामध्ये अनेक प्रोडक्ट्सवर अमेझॉन कडून भरघोस सूट जाहीर केली आहे. स्मार्टटीव्ही, इअरफोन्स, स्पीकर्स, समार्टवॉचेस, टॅबलेट्स यावर सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. रोजच्या वापरातील प्रमुख उपकरणांसोबतच अमेझॉनच्या या सेल मध्ये अनेक ब्रॅन्डेड इलेक्ट्रिक टूथब्रश वर देखील सूट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Oral-B, Caresmith आणि Agaro च्या टूथब्रशवर देखील सूट जाहीर करण्यात आली आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 मध्ये, Oral-B Pro Expert इलेक्ट्रिक टूथब्रश 890 रुपयांना खरेदी करता येईल.
अनेकांसाठी इलेक्ट्रिक टूथब्रश हे त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमधील वस्तू नसेल पण आपण अनेक वर्ष वापरत असलेले मॅन्युअल ब्रशच्या तुलनेत इलेट्रिक ब्रश हे अधिक फायद्याचे आहेत. इलेक्ट्रिक ब्रशच्या मदतीने दातांची आणि तोंडाची, हिरड्यांची अधिक उत्तमप्रकारे साफसफाई करता येते. इलेट्रिक ब्रश मधील ऑटोमॅटिक ब्रिसल्स आपण हाताने करत असलेल्या ब्रशच्या तुलनेत अधिक वेगाने सफाई करत असल्याने त्याचा फायदा होतो. इलेट्रिक ब्रश तोंडात सर्वदूर सारखीच आणि अधिक चांगल्याप्रकारे सफाई करू शकतो त्यामुळे दातांवरील प्लाक हटवण्यास मदत होते. परिणामी हिरड्या सुदृढ होतात.
इलेक्ट्रिक ब्रशमधील अनेक मॉडेल्स मध्ये बिल्ड इन टायमर असतो. अनेक डेंटिस्ट दातांच्या आरोग्यासाठी 2 मिनिटं प्रत्येक ठिकाणी ब्रश करण्याचा सल्ला देतात. इलेट्रिक ब्रश मध्ये हा 2 मिनिटांचा टायमर लावलेला असतो. त्यामध्ये प्रेशर सेंसर देखील असतात त्यामुळे दातांची, हिरड्यांची चुकीच्या पद्धतीने दात घासल्याने होत असलेली हानी देखील टाळण्यास मदत होते. मग तुम्हीही रोजच्या ब्रश पेक्षा इलेक्ट्रिक ब्रशचा वापर करण्याचा विचार करत असाल तर या अमेझॉन सेल मध्ये तुम्हांला खास ऑफर मध्ये इलेक्ट्रिक ब्रशची खरेदी करता येऊ शकते. तुम्ही एसबीआय च्या क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर केल्यास तुम्हांला तात्काळ 10% अतिरिक्त सूट मिळू शकते.
मॉडेल | लिस्ट प्राईज | सेल मधील किंमत |
Oral-B Pro 3 | Rs. 2,099 | Rs. 4,199 |
Oral-B Vitality Pro | Rs. 1,749 | Rs. 2,499 |
Agaro Cosmic Lite | Rs. 1,999 | Rs. 679 |
Caresmith Spark Inifinity | Rs. 4,000 | Rs. 1,198 |
Perfora Pro Oscillating | Rs. 1,799 | Rs. 1,499 |
Colgate Proclinical 150 | Rs. 999 | Rs. 627 |
जाहिरात
जाहिरात