अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 मध्ये ओरल-बी प्रो एक्सपर्ट इलेक्ट्रिक टूथब्रश 890 रुपयांना खरेदी करता येईल.
Photo Credit: Xiaomi
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५ ला पहिल्या ४८ तासांत ३.८ कोटी भेटी मिळाल्या
Amazon Great Indian Festival Sale 2025 चा आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. ग्राहकांसाठी हा सेल आता 23 सप्टेंबर पासून सुरू झाला आहे. यामध्ये ग्राहकांना मोठ्या सवलती मिळत आहेत. यामध्ये स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, स्मार्टवॉचेस, इअरफोन, स्पीकर्स, प्रोजेक्टर्स, स्मार्ट टीव्ही आणि अन्य होम अप्लायन्सेस यावर सूट मिळत आहे. महत्त्वाच्या गॅझेट्स सोबतच या सेलमध्ये वैयक्तिक रोजच्या वापरातील वस्तूंवरही सूट आहे. यामध्ये Oral-B, Caresmith आणि Agaro च्या इलेक्ट्रिक टूथब्रश वरही सूट मिळणार आहे.
इलेक्ट्रिक टूथब्रश अनेकांच्या यादीत प्रमुख वस्तू नसेल, परंतु जेव्हा रन-ऑफ-द-मिल मॅन्युअल टूथब्रशशी तुलना केली जाते तेव्हा इलेक्ट्रिक टूथब्रशचे काही फायदे समोर येतात. जलद आणि स्वयंचलित ब्रिसल हालचालींसह, ते हातांनी दात घासण्याच्या ब्रशच्या तुलनेत प्रति मिनिट जास्त हालचाल देते. हे ब्रश तोंडात एरवी हाताने ब्रश केल्यास पोहचू शकत नसलेल्या भागाचीही उत्तम स्वच्छता करतात. तोंडात प्लाक स्वच्छ करण्यासाठी आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील अनेक इलेक्ट्रिक ब्रश डिझाइन केलेले आहेत.
अनेक मॉडेल्समध्ये डेंटिस्टने शिफारस केलेल्या दोन मिनिटांसाठी ब्रश करण्यासाठी बिल्ट-इन टायमर आणि जास्त ब्रश करण्यापासून तुमच्या हिरड्यांचे संरक्षण करणारे प्रेशर सेन्सर देखील असतात. म्हणून, जर तुम्ही स्विच करण्यासाठी बाजारात असाल, तर विक्रीमध्ये आकर्षक सवलतींसह इलेक्ट्रिक टूथब्रश मिळविण्याची उत्तम संधी आहे. तुमच्या व्यवहारावर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळवण्यासाठी तुम्ही SBI डेबिट किंवा क्रेडिट कार्ड देखील वापरू शकता.
मॉडेल | लिस्ट प्राईजe | सेल प्राईज |
Oral-B Pro 3 | Rs. 2,099 | Rs. 4,199 |
Oral-B Vitality Pro | Rs. 1,749 | Rs. 2,499 |
Agaro Cosmic Lite | Rs. 1,999 | Rs. 679 |
Caresmith Spark Inifinity | Rs. 4,000 | Rs. 1,198 |
Perfora Pro Oscillating | Rs. 1,799 | Rs. 1,499 |
Colgate Proclinical 150 | Rs. 999 | Rs. 627 |
दरम्यान स्वच्छ दातांसाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे योग्य रित्या दात घासणे, फ्लोराईड टूथपेस्टने किमान दोन मिनिटे दातांच्या सर्व भागावर ब्रश करणे. टायमर असलेला इलेक्ट्रिक टूथब्रश तुम्हाला तेच करण्यास मदत करतो. म्हणूनच इलेक्ट्रिक टुथब्रश हा एक चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रिक ब्रश घेताना उत्तम प्रेशर सेन्सर असलेला ब्रश निवडा. हा एक शक्तिशाली आणि प्रभावी क्लिनर, तुमच्या हिरड्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य आणि पैसा वसुल असेल.
जाहिरात
जाहिरात