Fire TV Stick 4K Select हे HDMI सपोर्ट असलेल्या कोणत्याही जुन्या टीव्हीमध्ये लावले जाऊ शकते.
Photo Credit: Amazon
Fire TV Stick 4K Select मध्ये नवीन Vega OS, जलद परफॉर्मन्स
Amazon कडून भारतामध्ये Fire TV Stick 4K Select लॉन्च करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून भारतामध्ये streaming devices ची रेंज वाढवण्यात आली आहे. नवं मॉडेल Rs. 5,499 चे असून ते 4K streaming आणि Alexa voice सह आणण्यात आले आहे. सध्या ते भारतामध्ये ऑनलाईन आणि रिटेल आऊटलेट्स मध्येही उपलब्ध आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ते Amazon, Blinkit, Swiggy Instamart, Zepto आणि Croma, Vijay Sales आणि Reliance Retail सारख्या प्रमुख ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदी करता येईल.Amazon Fire TV Stick 4K Select हे टीव्हीला HDMI port द्वारा जोडले आहे. आणि 4K Ultra HD, HDR10+,Dolby Vision formats ला सपोर्ट करते. हे Amazon च्या नवीन Vega OS वर चालते, जे नेव्हिगेशन गती सुधारण्यासाठी आणि फायर टीव्ही प्रोडकट्स मध्ये अधिक सुसंगत इंटरफेस तयार करण्यासाठी विकसित केले आहे.
Amazonच्या मते, हे डिव्हाईस 1.7GHz क्वाड-कोर प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे जे मागील व्हेरिएंटच्या तुलनेत चांगले प्रतिसाद देते. यात ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, ज्यामुळे युजर्स इतर सुसंगत उपकरणांशी कनेक्ट होऊ शकतात. याशिवाय, अलेक्सा व्हॉइस रिमोट यूजर्सना व्हॉइस कमांड वापरून प्लेबॅक नियंत्रित करण्यासाठी, सेटिंग्ज व्यवस्थापित करण्यास सक्षम करते. भारतातील कोणत्याही फायर टीव्ही स्टिक मॉडेलपेक्षा Fire TV Stick 4K Select हा सर्वात वेगवान असल्याचे म्हटले जाते. Fire TV Stick 4K Select मध्ये Amazon ची नवीन Vega ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी फास्ट अॅप लाँच, एक नितळ इंटरफेस आणि सुधारित प्रतिसाद देते.
Fire TV Stick 4K Select प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्ने+ हॉटस्टार, यूट्यूब आणि झी५ सारख्या लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना सपोर्ट करते. रसिक ad-supported channels आणि लाइव्ह स्ट्रीमद्वारे देखील मोफत कंटेंट अॅक्सेस करू शकतात. हे HDMI सपोर्ट असलेल्या कोणत्याही जुन्या टीव्हीमध्ये लावले जाऊ शकते.
अमेझॉनने भारतात Fire TV Ambient Experience देखील सादर केला आहे. हे फीचर कनेक्टेड टेलिव्हिजन वापरात नसताना डिजिटल डिस्प्लेमध्ये रूपांतरित करते. यूजर्स हजारो क्युरेटेड आर्टवर्क्स आणि फोटोग्राफ्स किंवा घड्याळे, हवामान माहिती आणि कॅलेंडर सारखे डिस्प्ले विजेट्स पाहू शकतात. जरी हे फीचर्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध असले तरी, भारतातील एंट्री-लेव्हल फायर टीव्ही उत्पादनात ते पहिल्यांदाच दिसून येत आहे.
जाहिरात
जाहिरात