स्वस्त झाले AC, कारण आला आहे Amazon Great Freedom Festival 2024.

स्वस्त झाले AC, कारण आला आहे Amazon Great Freedom Festival 2024.

Photo Credit: Voltas

महत्वाचे मुद्दे
  • Amazon Great Freedom Festival 2024 हा सर्वांसाठी सक्रिय आहे.
  • Voltas, Daikin सारख्या अन्य ब्रँडचे AC मोठ्या सवलती सोबत खरेदीसाठी उपलब्ध
  • ग्राहकांना उपकरणांवर बँकेसोबतच एक्सचेंज ऑफर्सचा देखील लाभ घेता येणार आहे.
जाहिरात

नुकत्याच झालेल्या Prime Sale नंतर आता Amazon पुन्हा एकदा घेऊन आला आहे Amazon Great Freedom Festival 2024. इलेक्ट्रॉनिक आणि दैनंदिन वापरातील असंख्य वस्तूंवर भारी रकमेच्या सवलती ह्या सेलमध्ये मिळणार आहेत. 6 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजता हा सेल सुरू झालेला असून 11 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री पर्यंत हा सेल चालू राहणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जरी एखादी वस्तू तुम्ही सेल दरम्यान खरेदी केली, तरीही सेल संपल्यावर सुद्धा तुम्ही रिटर्न आणि रिफंड पॉलिसीचा लाभ घेऊ शकता. जाणून घेऊयात, Amazon Great Freedom Festival 2024 मधील AC वरील ऑफर्सबाबत.

Amazon Great Freedom Festival 2024 मधील एअर कंडिशनर वरील सवलती.

2024 मध्ये भारतात आलेल्या उष्णतेच्या लाटेने भारतातील AC ची मागणी चांगलीच वाढली होती. म्हणूनच Voltas, Panasonic यांसारख्या अन्य ब्रँड्सने सुद्धा आपले AC मोठ्या सवलतींवर Amazon Great Freedom Festival 2024 मध्ये उपलब्ध करून दिल्याने आता तुम्हाला AC विकत घ्यावाच लागेल. ह्यामध्ये Panasonic आपल्या Panasonic 1 Ton 3 Star Split ह्या AC वर तब्बल 15,000 रुपयांची सूट देत आहे, ज्यामुळे तुम्ही हा AC फक्त 32,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Godrej 2 Ton 3 Star 5-In-1 ह्या AC वर तुम्हाला मिळत आहे 32% ची सूट, जो खरेदी करताना तुम्ही वाचवू शकता तब्बल 20,000 रुपये. Voltas 1.5 ton 5 Star Inverter Split हा AC सुध्दा Amazon Great Freedom Festival 2024 सेलमध्ये 40,990 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो, ज्याची मूळ किंमत ही 75,990 रुपये इतकी आहे.

Hitachi 1.5 Ton Class 3 Star Inverter Split हा AC तुम्ही फक्त 37,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, ज्याची मूळ किंमत 63,100 रुपये आहे. आता बघूया Daikin च्या Daikin 1.5 Ton 5 Star Inverter AC कडे, ज्यावर मिळत आहे 32% ची सूट, जी मर्यादित आहे फक्त 11 ऑगस्ट पर्यंतच. त्यासोबतच Carrier ने सुध्दा आपल्या Carrier 1.5 Ton 3 Star AI Flexicool ह्या AC वर तब्बल 48% ची सूट दिली आहे. ज्यामुळे तुम्हाला हा AC फक्त 34,990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Amazon Great Freedom Festival 2024 मधील अन्य ऑफर्स.

Amazon Great Freedom Festival 2024 मध्ये तुम्हाला वस्तूंच्या किंमतीवरील सवलतींसोबत तुम्ही बँकांच्या क्रेडिट कार्डवरील सवलतींचा देखील लाभ घेऊ शकता. SBI बँकेच्या कार्डवर तुम्हाला जास्तीत जास्त 3000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. इतर बँकेच्या क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या सवलती जाणून घेण्यासाठी तुम्हाला Amazon च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायला हवी. त्यासोबतच जर तुमचे जुने प्रॉडक्ट तुम्ही एक्सचेंज करू इच्छिता तर, त्यासाठी तुम्हाला 4,500 रुपयांपर्यंत सूट देण्यात येईल.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »