Amazon Great Freedom Festival 2024 sale ची कमाल, इयरफोन्स फक्त 599 रुपयांमध्ये.

Samasung Galaxy Buds 3 वर 41% ची सूट देण्यात येत आहे. सोबतच Sony WH 1000XM4 16,490 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून त्याची मुळ किंमत 29,990 रुपये आहे.

Amazon Great Freedom Festival 2024 sale ची कमाल, इयरफोन्स फक्त 599 रुपयांमध्ये.

Photo Credit: Gadgets 360

महत्वाचे मुद्दे
  • 11 ऑगस्ट रोजी संपणार आहे, Amazon Great Freedom Festival 2024 sale.
  • JBL, OnePlus, Oppo, Realme, Boat अशा ब्रँडच्या TWS इयरफोन्सवर आकर्षक सवलत
  • अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
जाहिरात

Amazon Great Freedom Festival 2024 sale हा 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू झाला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह मोबाईल आणि मोबाईल ॲक्सेसरीज वर सुद्धा भारी सूट ह्या सेलमध्ये उपलब्ध आहे. खरं सांगायचं तर ह्या सेलमध्ये TWS इयरफोन्स किंवा हेडफोन्सवर 80% पर्यंत सूट देण्यात येत आहे ज्यामुळे तुम्हाला खरेदी करण्यापासून स्वतःला थांबवणे अशक्य आहे. चला तर मग बघूया, boAt, Samsung, JBL, Redmi, Jabra अशा अनेक ब्रँडच्या इयरफोन्स वरील उपलब्ध सवलती काय आहेत.

Amazon Great Freedom Festival 2024 Sale मधील TWS इयरफोन्स आणि हेडफोन्स वरील ऑफर्स.

तुम्हाला सुद्धा boAt चे इयरफोन्स खरेदी करायचे असतील तर सध्या चालू असलेल्या Amazon Great Freedom Festival 2024 Sale मध्ये boAt Airdopes 141 फक्त 1,299 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतात, ज्याची मूळ किंमत ही 5,990 रुपये आहे. त्यानंतर Samsung च्या इयरफोन्सकडे पाहिले तर Samsung Galaxy Buds2 pro वर तुम्हाला 9,100 रुपयांची सूट ह्या सेलमध्ये मिळणार आहे. ज्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे तुम्ही हे 8 ते 10 हजारच्या किंमतीमध्ये खरेदी करू शकता. सोबतच Samsung Galaxy Buds 3 वर 41% ची सूट देण्यात येत आहे, जे तुम्ही 11,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

OnePlus Nord Buds 2r 1,698 रुपये तर, Oppo Enco 3pro 3,799 रुपयांमध्ये Amazon Great Freedom Festival 2024 Sale मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. JBL Tune 770NC वर 47% ची सूट तर, JBL wave flex मात्र 2,299 मध्ये खरेदी करता येईल. Jabra Elite 4 वर तर 60% ची सूट देण्यात येत आहे, त्यासोबतच Sony WH 1000XM4 16,490 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून त्याची मूळ किंमत 29,990 रुपये आहे. Realme Buds T300 वर 2000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. सेलमधील ऑफर्स मुळे PTron Bassbuds duo pro तर फक्त 599 रुपयांमध्ये मिळत आहेत.

Amazon Great Freedom Festival 2024 मधील अतिरिक्त ऑफर्स.

जर Amazon Great Freedom Festival 2024 sale मध्ये खरेदी करण्यासाठी तुम्ही SBI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करत आहात तर प्रॉडक्टच्या किंमतीवर 10% पर्यंत आणि जास्तीत जास्त 3000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. Amazon Pay UPI चा वापर करून तुम्ही किमान 750 रुपयांची खरेदी केल्यास तुम्हाला 50 रुपयांचा कॅशबॅक सुद्धा मिळू शकतो. ICICI, HDFC, RBL, SBI सोबत अन्य काही निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर विभिन्न सवलती देखील उपलब्ध आहेत. Amazon Prime सदस्य असल्यास तुम्हाला खरेदीपासून डिलिव्हरी पर्यंत विशेष सवलती देखील मिळतात. शिवाय Amazon Great Freedom Festival 2024 मध्ये खरेदी केलेल्या वस्तूंवर सेल संपल्यानंतर रिटर्न आणि रिफंडची सुविधा देखील उपलब्ध आहे.

Product Deal Price MRP
OnePlus Nord Buds 2r Rs. 1,698 Rs. 2,299
Boat Airdopes 141 Rs. 1,299 Rs. 5,990
Noise Buds N1 Rs. 1,099 Rs. 3,499
Oppo Enco Air 3 Pro Rs. 3,798 Rs. 7,999
Realme Buds T300 Rs. 1,999 Rs. 3,999
PTron Bassbuds Duo Pro Rs. 599 Rs. 2,899
JBL Wave Flex Rs. 2,299 Rs. 4,999
Truke Buds Liberty Rs. 1,498 Rs. 6,999
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Vodafone Idea ने 5G सेवा 23 नव्या शहरांमध्ये होणार सुरू; प्रीपेड प्लान्स, डेटा स्पीड जाणून घ्या
  2. Moto G96 5G 9 जुलैला भारतात होणार लॉन्च; दमदार फीचर्स आणि स्टायलिश लुकची चर्चा
  3. iQOO 13 Green Edition भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत; पहा फीचर्स, किंमती काय?
  4. AI+ चे Nova 5G व Pulse स्मार्टफोन भारतात 8 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार
  5. Tecno चा Pova 7 5G स्मार्टफोन 4 जुलैला भारतात लॉन्च; मिळणार AI असिस्टंट आणि आधुनिक UI
  6. Vi चा धमाकेदार फॅमिली प्लॅन: 2 सिम, Netflix आणि Choice Benefits केवळ ₹871 मध्ये
  7. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  8. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  9. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  10. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »