HP या कंपनीने भारतात आपले नवीन Victus Edition लॅपटॉप्स मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च केले आहेत
Photo Credit: HP
Consumers will also get free access to HP Gaming Garage with the laptop
HP या कंपनीने भारतात आपले नवीन Victus Edition लॅपटॉप्स मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च केले आहेत. हे लॅपटॉप्स विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत फायदेशीर असून फक्त त्यांच्यासाठीच डिझाइन करण्यात आले आहेत, असे स्पष्ट मत सुध्दा HP कंपनीने मांडले आहे. याव्यतिरिक्त गेमिंग आणि ग्राफिक डिझाइनिंग साठी देखील या लॅपटॉपचा वापर करता येणार आहे. चला तर मग बहुया नुकत्याच लॉन्च झालेल्या HP Victus लॅपटॉप्सची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता.
HP Victus Edition असलेल्या या लॅपटॉप्स मध्ये 12th Gen Intel Core प्रोसेसर आणि NVIDIA GeForce RTX 3050 A GPU या चीपसेट द्वारे समर्थित असल्याचे दिसून येते. HP Victus स्पेशल एडिशन लॅपटॉप गेमिंग करताना एक चांगला गेमिंग अनुभव देण्यास समर्थित आहे.
HP Victus या लॅपटॉप मध्ये असलेल्या GPU मध्ये AI टेन्सर कोर वापरणे, डीप लर्निंग सुपर सॅम्पलिंग म्हणजेच DLSS सारखी वैशिष्ट्ये देखील समाविष्ट करण्यात आली आहेत जे कमी रिझोल्यूशन ग्राफिक्स उच्च गुणवत्तेवर वाढवण्यासाठी AI आणि मशीन लर्निंगचा वापर देखील करतात. लॅपटॉप ॲटमॉस्फेरिक ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे आणि ज्याचे वजन 2.29 किलो इतके आहे.
HP Victus या लॅपटॉपमध्ये FHD रिझोल्यूशन असलेला 15.6 इंचाचा डिस्प्ले बसविण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, स्मूथ स्क्रोलिंग अनुभव तसेच स्मूद गेमप्ले साठी डिस्प्ले 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटचे समर्थन करतो. या लॅपटॉप ची रॅम 16GB पर्यंत असून विभिन्न रॅम प्रकारामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. HP चे होमग्रोन ओमेन टेम्पेस्ट कूलिंग सोल्यूशन आणि थर्मल नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्फ्रारेड थर्मोपाइल सेन्सर देखील यामध्ये बसवले आहेत. हे लॅपटॉप्स 70Whr बॅटरीद्वारे समर्थित आहे.
HP Victus या नव्याने लॉन्च झालेल्या लॅपटॉप्सची किंमत भारतामध्ये 65,999 रुपयांपासून सुरू होत आहे. HP Victus स्पेशल एडिशन लॅपटॉप आता भारतात खरेदीसाठी HP वर्ल्ड स्टोअर्स, HP ऑनलाइन स्टोअर्स आणि काही निवडक मल्टी ब्रँड आउटलेट्सवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. नव्याने लॉन्च झाल्याने प्रास्ताविक ऑफर म्हणून, HP कोणत्याही Victus स्पेशल एडिशन लॅपटॉपच्या खरेदीवर मात्र 499 रुपयांची सूट देत आहे. सवलतीच्या व्यतिरिक्त या लॅपटॉपवर HyperX हे हेडसेट सुध्दा देण्यात येत आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Shambala Now Streaming Online: What You Need to Know About Aadi Saikumar Starrer Movie
Microsoft CEO Satya Nadella Says AI’s Real Test Is Whether It Reaches Beyond Big Tech: Report