Geekbench लिस्टिंग मध्ये फोनचा मॉडेल नंबर LDY-AN00 स्पॉट झाला आहे. ज्याला Honor Magic 8 Pro Air मानले जात आहे.
Photo Credit: Honor
HONOR ने नुकतेच HONOR Magic8 Pro Air सादर केले आहे.
Honor चा आगामी कॉम्पॅक्ट फ्लॅगशीप स्मार्टफोन Honor Magic 8 Pro Air लॉन्चसाठी सज्ज आहे. 19 जानेवारीला हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. या दरम्यान फोन Geekbench बेंचमार्क लिस्टिंगवर देखील दिसला आहे. ज्याद्वारा फोनच्या परफॉर्ममन्स आणि हार्डवेअर सोबत जोडलेल्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये दमदार प्रोसेसर आणि 16 जीबी पर्यंत रॅम मिळू शकते. Geekbench लिस्टिंग मध्ये या फोनचा मॉडेल नंबर LDY-AN00 स्पॉट झाला आहे. ज्याला Honor Magic 8 Pro Air मानले जात आहे. लिस्टिंग नुसार, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9500 चिपसेट सोबत येणार आहे. हा ऑक्टा कोअर प्रोसेसर आर्किटेक्चर सोबत आहे. ज्यामध्ये एक प्राईम कोअर 4.21GHz,तीन परफॉर्ममन्स कोअर 3.50GHz आणि चार एफिशिएंसी कोअर 2.70GHz चा स्पीड आहे. यामध्ये ग्राफिक्स साठी Mali-G1-Ultra-MC12 GPU मिळू शकते.
बेंचमार्क मध्ये टेस्ट करताना यूनिट Android 16 वर चालत असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये MagicOS 10 देण्यात आलं आहे. यासोबत फोन मध्ये 16GB रॅम आहे. ज्याद्वारा फोन सहज मल्टिटास्किंग आणि बराच वेळ स्टेबल परफॉर्ममन्स देऊ शकतो. Geekbench स्कोर पाहता त्याला सिंगल-कोर टेस्ट
मध्ये 2969 आणि मल्टि कोअर टेस्ट मध्ये 9892 गुण मिळाले आहेत.
आधी समोर आलेल्या माहितीनुसार, Honor Magic 8 Pro Air मध्ये 6.31 इंचाचा AMOLED डिस्प्ले देणार आहे. यामध्ये 1.5K रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि LTPO टेक्नोलॉजी असू शकते. डिस्प्ले मध्ये अल्ट्रा-स्लिम आणि सिमेट्रिकल बेजल्स असू शकतात. डोळ्यांच्या चांगल्या आरामासाठी, त्यात हाय-फ्रिक्वेन्सी PWM डिमिंगसाठी देखील समर्थन असू शकते.
Honor Magic 8 Pro Air स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा सोबत येण्याचा अंदाज आहे. त्यासोबत 50MP अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 64 MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आहे. हे 3x पेक्षा जास्त ऑप्टिकल झूमला सपोर्ट करू शकते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील असू शकतो. Honor Magic 8 Pro Air मध्ये 5,500mAh बॅटरी असू शकते. त्याला चार्ज करण्यासाठी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग आहे. या फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर, डुअल स्पीकर्स, eSIM सपोर्ट, डेडिकेटेड AI बटण आणि IP68 व IP69 वॉटर-डस्ट रेजिस्टेंस रेटिंग्स मिळू शकते.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात