फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 2026 भारतात 8 ऑगस्टपासून सुरू होणार.
Flipkart Freedom Sale भारतात पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. कंपनीची ही सेल भारतात 8 ऑगस्टपासून लाईव्ह होणार आहे. या सेलमध्ये कंपनी स्मार्टफोन, टॅबलेट, इतर कन्झ्युमर डिव्हाइसेस तसेच होम अप्लायन्सेसवर मोठ्या सवलती देण्याचे आश्वासन देत आहे. ग्राहकांना थेट डिस्काउंटसोबतच बँक ऑफर्सद्वारेही मोठी बचत करता येणार आहे.
फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 2026 भारतात 8 ऑगस्टपासून सुरू होणार असून, या सेलमध्ये मोबाइल फोन खरेदीवर मोठ्या सवलत मिळवू शकता. SBI क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10% इंस्टंट डिस्काउंट देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. सेल सुरू होण्यापूर्वीच कंपनीने विविध ऑफर्सची माहिती दिली आहे. Google Pixel 10 वर या सेलमध्ये मोठी सूट मिळणार आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी नक्कीच गमावू नका. चला, Google Pixel 10 वर मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Google Pixel 10 हा फोन सेलमध्ये ₹62,999 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे. तर या फोनची मूळ किंमत ₹79,999 आहे.तसेच जर तुम्हाला हा फोन मासिक हप्त्यांवर घ्यायचा असेल, तर ₹6,999 च्या मासिक EMI ऑफरद्वारेही तो घरी घेऊन जाता येईल.
Google Pixel 10a हा फोन सेलमध्ये ₹50,999 मध्ये खरेदी करता येणार आहे. तर या फोनची मूळ किंमत ₹56,999 आहे. तसेच, जर तुम्ही हा फोन हप्त्यांवर खरेदी करू इच्छित असाल, तर ₹8,499 च्या EMI ऑफरद्वारे तो घरी आणता येईल. यामध्ये दरमहा इतकीच रक्कम भरावी लागेल.
Google Pixel 10 Pro हा फोन सेलमध्ये ₹99,999 मध्ये खरेदी करता येणार आहे. तर या फोनची मूळ किंमत ₹1,09,999 आहे. हा फोन ₹11,111 च्या मासिक EMI वरही खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे Google Pixel 10 Pro XL हा फोन ₹1,14,999 मध्ये उपलब्ध असेल. या फोनवर ₹10,000 ची सूट देण्यात आली असून, त्याची मूळ किंमत ₹1,24,999 आहे.
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹64,150
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
Googlebook Render Leaked Again Ahead of Launch; Reveals Slim Profile