HMD Barbie Flip Phone भारतातही येणार; पहा बार्बी थीम्ड फोनमध्ये काय मिळणार?

HMD Barbie Flip Phone च्या ग्लोबल व्हर्जेन मध्ये 2.8-inch QVGA main screen आणि 1.77-inch QQVGA cover display आहे

HMD Barbie Flip Phone भारतातही येणार; पहा बार्बी थीम्ड फोनमध्ये काय मिळणार?

Photo Credit: HMD

ऑगस्ट २०२४ मध्ये निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये एचएमडी बार्बी फ्लिप फोनचे अनावरण करण्यात आले.

महत्वाचे मुद्दे
  • HMD Barbie Flip Phone भारतामध्ये येणार पण अद्याप ठोस तारखेची घोषणा नाही
  • फोनमध्ये beach-themed Malibu Snake game प्री इंस्टॉल
  • फोनच्या की पॅड मध्ये hidden palm trees, hearts आणी flamingo motifs आहेत
जाहिरात

HMD Barbie Flip Phone भारतामध्ये लवकरच लॉन्च होणार आहे अशी माहिती टीझर मधून समोर आली आहे. काही भागांमध्ये हा फोन ऑगस्ट 2024 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. फोनच्या फ्लिप फीचरला गुलाबी रंगामध्ये Barbie aesthetics आहेत. फोनसोबत असलेल्या अन्य वस्तू ज्यामध्ये बॅक कव्हर, चार्जर,बॅटरी हे देखील गुलाबी रंगांमध्ये आहेत. फोनमध्ये बार्बी ची थीम असलेला इंटरफेस आहे. Barbie Flip Phone चं कव्हर डिस्प्ले आरशाप्रमाणेही काम करतो. हा ज्वेलरी बॉक्स स्टाईल केस मध्ये मिळणार आहे.

HMD Barbie Flip Phone भारतात कधी?

HMD Barbie Flip Phone भारतामध्ये लवकरच येणार आहे अशी माहिती X वरील पोस्ट मध्ये देण्यात आली आहे. फोनची लॉन्च डेट अद्याप सांगण्यात आलेली नाही. फोनचं डिझाईन हे प्रमोशनल इमेज प्रमाणेच दिसत आहे. त्यामुळे भारतामध्येही हा फोन असाच लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे.

HMD Barbie Flip Phone च्या ग्लोबल व्हर्जेन मध्ये 2.8-inch QVGA main screen आणि 1.77-inch QQVGA cover display आहे. जो आरशाप्रमाणे काम करतो. या फोनला Unisoc T107 SoC चा सपोर्ट असून तो 64MB of RAM आणि 128MB of onboard storage सोबत जोडलेला आहे. या फोनमध्ये 0.3-megapixel rear camera आणि LED flash unit आहे.

HMD च्या Barbie Flip Phone मध्ये Power Pink shade आहे. फोनच्या की पॅड मध्ये hidden palm trees, hearts आणी flamingo motifs आहेत. जे अंधारामध्ये चमकतात. जेव्हा फोन सुरू केला जातो तेव्हा “Hi Barbie” अशा आवाजात स्वागत केले जाते. हा फोन S30+ OS वर चालतो. या फोनमध्ये beach-themed Malibu Snake game प्री इंस्टॉल केलेला आहे.

फोनमध्ये 1,450mAh removable battery आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, सिंगल चार्ज मध्ये फोनची बॅटरी 9 तास चालू शकते. फोनची बॅटरी आणि चार्जेर देखील फोनसोबत देताना गुलाबी रंगामध्येच असणार आहे. हा फोन 4G, Bluetooth 5.0, 3.5mm audio jack, आणि USB Type-C connectivity ला सपोर्ट करतो. तर अमेरिकेमध्ये या फोनची किंमत 129 डॉलर्स आहे. भारतीय रूपयांमध्ये त्याची किंमत अंदाजे 10,800 रूपये आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  2. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  3. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  4. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  5. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  6. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
  7. भारतीयांना iPhone 17 Series आणि iPhone Air मिळवण्यासाठी करावी लागणार प्रतिक्षा
  8. Poco M7 Plus 5G चा नवा 4GB RAM व्हेरिएंट भारतात येतोय; पहा लॉन्च कधी
  9. पहिल्यांदाच समोर आले Nothing Ear 3 चे डिझाइन; पहा अपडेट्स
  10. Flipkart ची iPhone 14 साठी सर्वात स्वस्त डील; पहा अ‍पडेट्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »