Oppo K13 Turbo Pro 5G फोनवर मोठी सूट आहे.
Oppo K13 Turbo Pro 5G फोनवर जबरदस्त डिस्काउंट, कॅशबॅक ऑफरसह मोठी बचत! स्मार्टफोनची किमती वाढत आहेत, तर दुसरीकडे काही फोनवर आकर्षक सवलतीही मिळत आहेत. Oppo K13 Turbo Pro 5G हा फोन एमआरपीपेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करता येत आहे. फोनवर डिस्काउंटसोबत कॅशबॅक ऑफरही उपलब्ध आहे. फोनचा 8GB रॅम, 256GB स्टोरेज व्हेरिएंट आता एमआरपीपेक्षा खूपच कमी किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. चला तर मग Oppo K13 Turbo Pro 5G वरील या खास डीलबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Oppo K13 Turbo Pro 5G सध्या सवलतीच्या किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. फोनचा 8GB रॅम, 256GB स्टोरेज व्हेरिएंटची एमआरपी साधारणपणे 41,999 रुपये आहे. मात्र Flipkart वर हा फोन 26% डिस्काउंटसह उपलब्ध असून त्यानंतर त्याची किंमत 30,999 रुपये इतकी राहते. म्हणजेच एमआरपीच्या तुलनेत थेट 11,000 रुपयांची सूट मिळत आहे. मात्र ऑफर इथेच संपत नाही.
Oppo K13 Turbo Pro 5G वर बँक ऑफरचाही लाभ मिळत आहे. निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 1,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत करता येते. त्यानंतर फोनची प्रभावी किंमत 29,499 रुपये इतकी राहते. म्हणजेच एकूण मिळून हा फोन एमआरपीपेक्षा 12,000 रुपयांहून अधिक स्वस्तात खरेदी करता येतो. अधिक माहितीसाठी ऑफर पेजला भेट देऊ शकता.
Oppo K13 Turbo Pro मध्ये 6.80 इंचाचा LTPS AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,600 निट्सपर्यंत ग्लोबल पीक ब्राइटनेस मिळतो. K13 Turbo Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 15 आधारित ColorOS 15 वर चालतो. तसेच धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोनमध्ये वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स फीचरही देण्यात आले आहे.
Oppo K13 Turbo च्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 7,000mAh ची बॅटरी असून ती 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे.
हे सुद्धा वाचा :
https://marathi.gadgets360.com/mobiles/delhi-police-officer-spotted-wearing-ray-ban-smart-glasses-during-cjp-protest-heres-what-they-can-do-news-11821342
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹64,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
iQOO Pad Ultra Set to Launch on September 29; Design, Key Specifications Revealed