Photo Credit: Huawei
Huawei Nova 13 series चीन मध्ये ऑक्टोबर महिन्यात लॉन्च झाला आहे. आता हा फोन जगभर उपलब्ध होणार आहे. या फोनच्या लाईनअप मध्ये Huawei Nova 13 आणि Nova 13 Pro या दोघांचा समावेश आहे. दोन्ही मॉडेल्स हे Kirin 8000 chipsets सह येणार आहेत. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. हा फोन 100W सह चार्ज होणार आहे. चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेले Huawei FreeBuds Pro 4 हे चीनबाहेर आता Nova 13 series स्मार्टफोनसह उपलब्ध होत आहेत. कंपनीने Huawei Mate X6 book-style foldable smartphone देखील ग्लोबल मार्केट मध्ये आणले आहेत.
Huawei Nova 13 ही भारतीय रूपयांत 46,100 म्हणजे MXN 10,999 ला उपलब्ध आहे. ही किंमत 12GB + 256GB साठी आहे. Nova 13 Pro ची किंमत MXN 15,999 आणि भारतीय रूपये 67,100 मध्ये उपलब्ध आहे. ही किंमत 12GB + 512GB व्हेरिएंट साठी आहे. हा फोन ब्लॅक, ग्रीन आणि पांढर्या रंगात आहे.
Huawei FreeBuds Pro 4 earphones हे MXN 3,199 म्हणजे भारतीय रूपये 13,400 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन काळा, हिरवा आणि पांढर्या शेडमध्ये उपलब्ध आहे. सध्या हे मेक्सिको मध्ये विक्रीसाठी खुले आहेत. तसेच जगात काही निवडक ठिकाणी उपलब्ध आहे.
Huawei Nova 13 मध्ये 6.7-inch Full-HD+ OLED screen आहे तर प्रो व्हेरिएंट मध्ये 6.76-inch OLED quad-curved display आहे. फोनमध्ये Kirin 8000 SoCs आहे आणि हे फोन Android 14-based HarmonyOS 4.2. वर चालतात. दोन्ही फोनमध्ये 5,000mAh बॅटरीज आहेत आणि 100W wired fast charging support आहे.
दोन्ही फोनमध्ये 50-megapixel primary rear sensors आहेत. Huawei Nova 13 मध्ये 8-megapixel ultra-wide shooter आहे आणि प्रो मॉडेल मध्ये 12-megapixel telephoto camera आहे. सेल्फी, व्हिडिओ कॉल साठी 60-megapixel sensors चा फ्रंट कॅमेरा आहे. प्रो व्हेरिएंट मध्ये 8-megapixel 5x zoom lens आहेत.
Huawei FreeBuds Pro 4 मध्ये 11mm four-magnet dynamic driver आहेत. micro-flat tweeter आहे. Hi-Res Audio certification आहे. इयरफोनला टच कंट्रोल आहे. दोन्हींना चार्जिंग केस आहे. एका चार्जमध्ये 22 तास music playback time मिळतो.
जाहिरात
जाहिरात