Photo Credit: Samsung
Samsung Galaxy Unpacked 2025 अमेरिकेमध्ये आज San Jose, California,मध्ये त्याची पहिली झलक दाखवणार आहे. या वार्षिक कार्यक्रमामध्ये new generation Galaxy S series ज्याला Galaxy S25 series म्हणून ओळखले जाणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या फोनमध्ये artificial intelligence (AI) experiences मध्ये मोठी लीप घेतली जाणार आहे. भारतामध्ये या फोनच्या प्री-रिझर्व्हेशनला सुरूवात झाली आहे. जे हा फोन प्री रिझर्व्ह करणार आहेत त्यांना याचे स्पेशल बेनिफिट्स मिळतील.
Samsung कडून आता Galaxy Unpacked 2025 ची माहिती देण्यात आली आहे. 22 जानेवारीला भारतीय स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10.30 वाजता हा फोन लॉन्च होणार आहे. Samsung.com प्रमाणेच Samsung Newsroom आणि अन्य अधिकृत युट्युब चॅनलवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहक त्यांची सीट Rs. 1,999 देऊन रिझर्व्ह करू शकतात. याद्वारा Galaxy Pre-reserve VIP Pass मिळतील. सोबत 5000 रूपयांचे बेनिफिट्स मिळणार आहेत. याद्वारा त्यांना आपोआप 50 हजार रूपयांच्या गिव्हअवे ची संधी मिळणार आहे.
Samsung Galaxy Unpacked 2025 बाबत माहिती
Samsung च्या माहितीनुसार, Galaxy Unpacked 2025 event मध्ये Galaxy S series येणार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पूर्वीचे ट्रेंड्स पाहता यामध्ये 3 मॉडेल्सचा समावेश आहे. ज्यात Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra आहे. हे तिन्ही व्हेरिटंस Qualcomm च्या Snapdragon 8 Elite SoC सह 12GB of RAM चे असणार आहेत.
Galaxy S25 model मध्ये 4,000mAh battery असणार आहे. तर Plus आणि Ultra व्हेरिएंट मध्ये 4,900mAh आणि 5,000mAh बॅटरीज असतील. लीक झालेल्या माहितीनुसार, Galaxy S25 Ultra मध्ये rounded corners असतील. तर अन्य मॉडेल्सच्या डिझाईन मध्ये बदल नसतील.
Galaxy S25 series सोबत extended reality (XR) headset असतील जे डिसेंबर 24 मध्ये जाहीर झाले होते. हे गूगलच्या नव्या Android XR platform वर चालतील. यामध्ये augmented reality (AR), virtual reality (VR),आणि artificial intelligence (AI) चा सपोर्ट असणार आहे. यामध्ये Galaxy S25 Slim ची झलक दिसण्याचा अंदाज आहे.
Galaxy Ring 2 देखील कार्यक्रमात दिसू शकतो असा अंदाज आहे. Oura Ring सोबत स्पर्धेत उतरण्यासाठी 2 स्लीम साईझ येण्याचा अंदाज आहे. first-generation Galaxy Ring च्या तुलनेत अधिक अचूक हेल्थ डेटा सेन्सर, सुधारित AI कार्यक्षमता आणि दीर्घ बॅटरी लाइफसह वेअरेबल येण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात