Photo Credit: Jio
Reliance Jio कडून काही JioFiber, AirFiber subscribers ना आता 2 वर्षांसाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय YouTube Premium services मिळणार आहे. ही ऑफ़र JioFiber आणि AirFiber postpaid customers ना मिळणार आहे. युजर्सना त्यांचे गूगल अकाऊंट्स किंक करून हे फायदे मिळवता येणार आहेत. YouTube Premium त्यांच्या युजर्सना अॅड फ्री कंटेंड देतात. तसेच background playback ला सपोर्ट करतात. युजर्स यामध्ये ऑफ़लाईन काही व्हिडिओज पाहण्यासाठी डाऊनलोड करू शकतात. YouTube Music चा देखील ऑफलाईन अॅक्सेस दिला जातो.
Reliance Jio च्या X post मध्ये दिलेल्या माहितीनुसार, JioFiber आणि Jio AirFiber postpaid customers ना 24 महिन्यांसाठी YouTube Premium ची सेवा मिळणार आहे. त्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागणार नाहीत.
Rs. 888, Rs. 1,199, Rs. 1,499, Rs. 2,499, आणि Rs. 3,499च्या सब्सस्क्रायबर्सना हा प्लॅन मिळणार आहे. यामध्ये JioFiber आणि Jio AirFiber postpaid plans मध्ये स्पीडचा पर्याय 30Mbps, 100Mbps, 300Mbps, 500Mbps आणि 1Gbps दिला जातो. या प्लॅन मध्ये अनलिमिटेड डाटा, फ्री वॉईस कॉलिंग आणि Netflix Basic, Amazon Prime Lite, Disney+ Hotstar, Sony Liv, आणि Zee5 चा अॅक्सेस मिळतो.
free YouTube Premium चा अॅक्सेस मिळवण्यासाठी पात्र JioFiber आणि Jio AirFiber postpaid युजर्सना MyJio app किंवा Jio.com वर लॉगिन करावं लागेल. संबंधित बॅनर वर क्लिक करा. त्यानंतर गूगल अकाऊंट लिंक करावं लागेल. ते झाल्यानंतर YouTube Premium subscription कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अॅक्टिव्हेट होईल. सब्सस्क्रिप्शन हे 24 महिन्यांसाठी वैध असेल.
YouTube Premium चा प्रति महिना प्लॅन हा 149 रूपये आहे. student monthly plan आणि family plan cost हा अनुक्रमे 89 आणि 299 चा आहे. Premium subscription मध्ये अॅड फ्री पाहता येतो. ऑफलाइन व्हिडिओ पाहण्यासाठी तो डाउनलोड करण्याची परवानगी देते आणि त्यांच्या डिव्हाइसवर मल्टीटास्किंग करताना मागील व्हिडिओ प्ले करण्याचा पर्याय मिळतो.
जाहिरात
जाहिरात