Photo Credit: BSNL
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडून भारतामध्ये काही भागात पहिला फायबर बेस्ड इंटरनेट टीव्ही लॉन्च ची घोषणा झाली आहे. ही सेवा IFTV म्हणून ओळखली जाणार आहे. Fibre-to-the-Home च्या सब्सस्क्रायबर्सना सेवा देण्यासाठी IFTV मागील महिन्यात लॉन्च झाला आहे. यासोबतच BSNL चा नवा लोगो आणि सहा अन्य सुविधा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
IFTTV कडून अनेक लाईव्ह चॅनेल्स दिले जाणार आहेत. BSNL च्या सोशल मीडीया अपडेट्स नुआर, या सेवेमध्ये 500 लाईव्ह चॅनेल्स आहेत. तर त्यांच्या अधिकृत वेबसाइटने नमूद केले आहे की 300 हून अधिक चॅनेल केवळ मध्य प्रदेश आणि तामिळनाडूच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. शिवाय, ते Pay TV content देखील ऑफर करेल, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल द्वारे ऑफर केलेल्या इतर थेट टीव्ही सेवांप्रमाणे, जेथे स्ट्रीमिंगद्वारे वापरला जाणारा डेटा Monthly Quota तून वजा केला जातो, BSNL IFTV च्या बाबतीत असे होणार नाही.
बीएसएनएल च्या माहितीनुसार, टीव्ही स्ट्रिमींग साठी असलेला डाटा हा स्वतंत्र असणार आहे. तो FTTH pack मधून कापला जाणार नाही. त्याच्याऐवजी स्ट्रिमिंग साथी अमर्याद डाटा असणार आहे. लाईव्ह टीव्ही सर्व्हिस हे विशेषतः BSNL FTTH customers साठी अधिकचा दर आकारला जाणार नाही.
BSNL ने पुष्टी केल्यानुसार, लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आणि स्ट्रीमिंग ॲप्स जसे की Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Netflix, YouTube आणि ZEE5 ला देखील सपोर्ट करणार आहे. याव्यतिरिक्त, ते गेम्स देखील ऑफर करेल. तर बीएसएनएल ऑपरेटर च्या माहितीनुसार, त्यांची IFTV सेवा सध्या फक्त Android TV सह काम करणार आहेत. Android 10 किंवा त्यानंतरचे टीव्ही असलेले ग्राहक Google Play Store.bii वरून BSNL Live TV ॲप डाउनलोड करू शकतात.
कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन (IPTV) सेवा दिल्या आहेत. आता सेवा सुरक्षितपणे, परवडणारी आणि विश्वासार्हपणे प्रदान करणे ही 3 उद्दीष्टं आहेत.