आता कॉलिंग, एसएमएस ला सीम कार्डची गरज नाही, BSNL कडून direct-to-device satellite ची घोषणा

आता कॉलिंग, एसएमएस ला सीम कार्डची गरज नाही, BSNL कडून direct-to-device satellite ची घोषणा

Photo Credit: BSNL

सेवा ॲड-ऑन म्हणून ऑफर केली जाईल की विद्यमान योजनांसह एकत्रित केली जाईल हे स्पष्ट नाही

महत्वाचे मुद्दे
  • सॅटेलाईट कनेक्टीव्हिटी सर्व्हिस ही Viasat सोबत विकसित केली आहे
  • BSNL ची ही नवी सर्व्हिस IMC 2024 मध्ये पहिल्यांदा समोर आली होती
  • BSNL ने सर्व्हिसची टेस्टिंग ऑक्टोबर महिन्यात सुरू केली होती
जाहिरात

भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कडून direct-to-device satellite connectivity service ची बुधवार, 13 नोव्हेंबर दिवशी घोषणा केली आहे. Indian Department of Telecommunications च्या माहितीनुसार, ही भारतामधील पहिली सेटॅलाईट डिव्हाईस सर्व्हिस आहे. इंडियन टेलिकॉम कडून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंपनी Viasat ने त्यांना मदत केली आहे. याचा उद्देश ग्राहकांना अगदी ग्रामीण भागातही चांगली कनेक्टिव्हिटी देणं हा आहे.Indian Mobile Congress (IMC) 2024 मध्ये पहिल्यांदा बीएसएनएल कडून या सर्व्हिसची माहिती देण्यात आली आहे.

एक्स या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर दिलेल्या माहितीनुसार, DoT India ने या नव्या सुविधेची घोषणा केली आहे. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी हे नवीन तंत्रज्ञान नाही, Apple ने प्रथम आयफोन 14 मालिकेतील स्मार्टफोनसह हे जाहीर केले आहे. सॅटलाईट कम्युनिकेशन हे सामान्य युजर्ससाठी नाही. आतापर्यंत ही सेवा केवळ
emergency services, सैन्य यांच्यापुरती मर्यादित आहे.

डिरेक्ट टू डिव्हाईस मध्ये बीएसएनएल ही सेवा देताना त्याच्या सर्व युजर्सना दुर्गम भागात राहूनही कनेक्ट राहण्याची क्षमता देते.

satellite connectivity service मुळे आता Spiti Valley मध्ये Chandratal Lake वर ट्रेकिंग करणारे आणि राजस्थान मधील दुर्गम भागात राहणारे नागरिक देखील आपल्या प्रियजणांसोबत कनेक्टेड राहू शकणार आहेत.

BSNL च्या माहितीनुसार, ही सेवा आपत्कालीन स्थिती मध्ये म्हणजे जेव्हा cellular network किंवा Wi-Fi connectivity नसताना कॉल करता येणार आहे. युजर्स SoS messages करू शकतील, UPI payments करू शकतील. कंपनीने non-emergency परिस्थितीतही कॉल किंवा एसएमएस पाठवले जाऊ शकतात की नाही यावर माहिती दिलेली नाही.

हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी Indian telecom provider सह भागीदारी केलेल्या Viasat ने गेल्या महिन्यात एका प्रेस रीलिज जारी करत ही सेवा non-terrestrial network (NTN) कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही बाजूने संवाद साधण्यास मदत करेल असे म्हटलं आहे. IMC 2024 मधील प्रात्यक्षिकात, टेक जायंट त्याच्या geostationary L-band satellites पैकी एकाला 36,000 किमी दूर संदेश पाठवला आणि त्याच्याकडूनही मेसेज मिळवला आहे.

BSNL आणि Viasat ने ऑक्टोबर महिन्यामध्ये ट्रायल्स सुरू केले आहे. एका महिन्यातच युजर्ससाठी सेवा लॉन्च करण्यात आली आहे. मात्र तरीही काहा अनिश्चितता आहे. अद्याप सर्व्हिस प्रोव्हायडर कडून युजर्सना ही satellite connectivity मिळवण्यासाठी काय करावं लागेल हे सांगितले नाही. युजर्सना त्यांच्या सध्याच्या प्लॅनमध्ये हे फीचर दिले जाईल की त्यासाठी स्वतंत्र योजना खरेदी कराव्या लागतील हे देखील निश्चित नाही.

Comments
पुढील वाचा: BSNL, BSNL Satellite Connectivity
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »