iPhone 15 Plus वर मिळणार 21 हजारांपर्यंत सूट

iPhone 15 Plus वर मिळणार 21 हजारांपर्यंत सूट

Photo Credit: Apple

iPhone 15 Plus (pictured) is offered in Black, Blue, Green, Pink and Yellow colourways

महत्वाचे मुद्दे
  • iPhone 15 Plus मागील वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये लाँच झाला होता
  • या स्मार्टफोन मध्ये 6.7इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे
  • iPhone 15 Plus तीन विभिन्न स्टोरेज पर्यायांमध्ये येतो
जाहिरात

Apple या स्मार्टफोन कंपनीने आपला आगामी स्मार्टफोन म्हणजेच iPhone 16 त्यांच्या It's Glowtime या 9 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आणि या संधीचा पुरेपूर लाभ वापरकर्त्यांना घेता यावा म्हणून मागच्याच वर्षी लॉन्च झालेल्या iPhone 15 Plus या स्मार्टफोनवर आता भारी सूट देण्यात येत आहे. चला तर मग बघुया, नक्की काय आहे ही ऑफर आणि कीती दिवसांपर्यंत मर्यादित आहे.

iPhone 15 Plus वरील ऑफर्स

iPhone 15 Plus या स्मार्टफोनचे स्टोरेज क्षमतेच्या आधारे तीन प्रकार पडतात. ज्यामध्ये 128 GB स्टोरेज या प्रकाराची किंमत भारतामध्ये 89,990 रुपये इतकी असून आता फ्लिपकार्ट वर मिळणाऱ्या 13,901 रुपयांच्या सवलतीमुळे हा स्मार्टफोन तुम्ही मात्र 75,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त जर तुम्ही आधीच एक iPhone वापरकर्ते आहात तर, तुम्हाला एक्सचेंज ऑफर म्हणून जुन्या आयफोन ची देवाणघेवाण केल्यास 38,350 रुपयांची सूट देण्यात येत आहे.

याव्यतिरिक्त iPhone 15 Plus च्या 256 GB या प्रकाराची मूळ किंमत ही 99,600 रुपये इतकी असून त्यावर 14,000 रुपयांची सूट देण्यात आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टवर 85,600 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्यानंतर यामधील 256 GB या प्रकाराची मूळ किंमत 1,19,600 रुपये इतकी असून तुम्ही हा स्मार्टफोन 99,600 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या सवलतीमुळे तुम्ही 20,000 रुपयांची बचत करू शकता.

तसेच जर तुम्ही HSBC किंवा फेडरल बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून या स्मार्टफोनची खरेदी करत आहात, तर तुम्हाला अधिक 1500 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. सोबतच जर तुम्ही बँक ऑफ बडोदा बँकेचे UPI वापरून हा स्मार्टफोन खरेदी करत आहात तर, तुम्हाला 1000 रुपयांची सवलत दिली जाईल.

iPhone 15 Plus ची वैशिष्ट्ये

iPhone 15 Plus मध्ये 6.7 इंचाचा रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये फोटोग्राफी प्रेमींसाठी 48 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल लेन्स सोबत ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून जबरदस्त सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. A16 बायोनिक चिपद्वारे समर्थित असलेला iPhone 15 Plus हा स्मार्टफोन जलद कामगिरी आणि कार्यक्षमता सुनिश्चित करतो.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »