Flipkart च्या GOAT Sale मध्ये iPhone 16 मिळणार 69,999 रूपयात

iPhone 16 ची किंमत सुमारे दहा हजारांनी कमी करण्यात आली आहे. 128GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 69,999 असणार आहे.

Flipkart च्या GOAT Sale मध्ये iPhone 16 मिळणार 69,999 रूपयात

Photo Credit: Apple

भारतात ७९,९०० रुपयांच्या किमतीत बेस १२८ जीबी आयफोन १६ चे अनावरण करण्यात आले

महत्वाचे मुद्दे
  • iPhone 16 सीरीज वर 11 हजारांपर्यंत सूट मिळत आहे
  • iPhone 16 मध्ये A18 chipset आणि iOS 18
  • Amazon आणि Flipkart वर सध्या सुरू सेल मध्ये धमाकेदार ऑफर्स
जाहिरात

iPhone 17 सीरीज च्या लॉन्चपूर्वी आता अ‍ॅप्पल कडून The iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max या स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. सुमारे 11 हजार रूपयांपर्यंत त्यांना सूट मिळवता येणार आहे. स्मार्टफोनचे हे डील्स Amazon आणि Flipkart वर उपलब्ध आहेत. अ‍ॅप्पल कडून आता सप्टेंबर महिन्यात आयफोन 17 सीरीज लॉन्च केली जाणार आहे. त्यापूर्वी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर iPhone 16,iPhone 16 Plus, iPhone 16 Pro Max, iPhone 16 Pro वरील ऑफर्स पहा काय आहेत?iPhone 16 वर दहा हजारांची सूटiPhone 16 ची किंमत सुमारे दहा हजारांनी कमी करण्यात आली आहे. 128GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 69,999 असणार आहे. या फोनवर फ्लिपकार्ट वर 9901 रूपयांची सूट देण्यात आली आहे. अमेझॉन कडून iPhone 16 128GB variant वर 7 हजारांची सूट दिली आहे. सोबत बॅंक कार्ड ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स देखील आहेत.

दरम्यान iPhone 16 Plus च्या किंमती फ्लिपकार्ट वर 9901 रूपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. या फोनची किंमत 79,999 पासून सुरू होते. अमेझॉन वर Ultramarine variant of the iPhone 16 Plus वर 7400 रूपयांची सूट देण्यात आली आहे. हा फोन 82,500 मध्ये उपलब्ध होणार आहे. तर अन्य रंगांचे फोन 83,500 मध्ये मिळतील. Flipkart ने iPhone 16 Pro वर दहा हजारांची सूट जाहीर केली आहे. या फोनची किंमत 1,09,900 आहे.अमेझॉन वर याच फोन वर 8000 रूपयांची सूट मिळत आहे. iPhone 16 Pro Max
फ्लिपकार्ट1,34,000 मध्ये खरेदी करता येईल. अमेझॉन वर या फोन वर 11 हजारांची सूट आहे. 256GB model 1,33,900 मध्ये उपलब्ध असेल. या फोन वर देखील बॅंक ऑफर्स मिळणार आहेत. 1TB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर लिस्टेट नाही, फक्त अमेझॉनवर उपलब्ध आहे.

फ्लिपकार्टचा GOAT सेल 2025 सुरू आहे. हा सेल 12 जुलैला Amazon Prime Day 2025 सेलसोबत सुरू झाला आणि 17 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

iPhone 16 मध्ये 6.1-inch Super Retina XDR OLED display आहे. Ceramic Shield protection आहे. यामध्ये A18 chipset आणि iOS 18 आहे. फोनमध्ये 48-megapixel primary sensor आणि मागील बाजूला 12-megapixel ultrawide shooter आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »