iQOO 13 भारतात दाखल पहा किंमत काय? फीचर्स काय? कधी, कुठून करू शकाल खरेदी

iQOO 13 मध्ये 4 Android software updates आणि 5 वर्ष security updates मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

iQOO 13 भारतात दाखल पहा किंमत काय? फीचर्स काय?  कधी, कुठून करू शकाल खरेदी

iQOO 13 (चित्रात) 6,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे

महत्वाचे मुद्दे
  • iQOO 13 भारतात 11 डिसेंबरला दुपारी 12पासून विक्रीसाठी खुला
  • Snapdragon 8 Elite चिपसह बाजारात आलेला दुसरा स्मार्टफोन
  • हा फोन Legend आणि Nardo Grey रंगांमध्ये उपलब्ध
जाहिरात

iQOO 13 हा मंगळवारी भारतात Qualcomm कडून Snapdragon 8 Elite चिपसह बाजारात आलेला दुसरा स्मार्टफोन आहे. या हॅन्डसेट मध्ये 50-megapixel rear cameras आहे तर 6.82-inch AMOLED screen आणि 144Hz refresh rate आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर चालणारा आहे. यामध्ये Vivo प्रमाणे Funtouch OS 15 skin आहे. iQOO च्या स्मार्टफोन मध्ये 6,000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 120W सह चार्ज होते. दरम्यान हा हॅन्डसेट IP68 आणि IP69 रेटिंगसह उपलब्ध असल्याने त्याचे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण होणार आहे.

भारतामध्ये iQOO 13 ची किंमत आणि उप्लब्धता काय?

iQOO 13 ची भारतामधील किंमत ही सुमारे 54,999 रूपये आहे. बेस मॉडेल मध्ये हा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज सह आहे. तर हा फोन 16GB+512GB या व्हेरिएंट मध्ये विकत घेण्यासाठी 59,999 रूपये मोजावे लागणार आहेत. हा फोन Legend आणि Nardo Grey रंगांमध्ये उपलब्ध आहे.

ग्राहकांना iQOO 13 हा स्मार्टफोन 11 डिसेंबर पासून विक्रीसाठी खुला होणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून त्याची विक्री ऑनलाईन माध्यमात ईकॉमर्स वेबसाईट अमेझॉन आणि iQOO e-store वर उपलब्ध होणार आहे. या फोनच्या खरेदीसाठी HDFC Bank किंवा ICICI Bank चे डेबिट, क्रेडिट कार्ड वापरल्यास ग्राहकांना 3000 रूपयांपर्यंत सूट मिळणार आहे. Vivo आणि iQOO चे हॅन्डसेट्स एक्सचेंज केल्यास ग्राहकांना 5000 रूपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.

iQOO 13 ची स्पेसिफिकेशन्स काय?

iQOO 13 हा ड्युअल सीम स्मार्टफोन आहे. हा Android 15-based Funtouch OS 15,वर चालणारा फोन आहे. यामध्ये 4 Android software updates आणि 5 वर्ष security updates मिळणार आहेत. सोबतच 6.82-inch 2K (1,440x3,186 pixels) LTPO AMOLED screen आहे. 144Hz refresh rate, 510ppi pixel density,आणि 1,800nits peak brightness आहे.

भारतामध्ये Qualcomm च्या 3nm octa core Snapdragon 8 Elite chip सह येणारा हा दुसरा फोन आहे. फोनमधील चीप 12GB of LPDDR5X Ultra RAM आणि 512GB of UFS 4.1 storage सह आहे. iQOO 13 मध्ये iQOO's Q2 chip देखील असणार आहे ज्याचा वापर गेम्स साठी केला जाणार आहे.

कनेक्टीव्हिटी साठी 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, GPS,आणि USB 3.2 Gen 1 Type-C port आहे. फोनचा आकार हा 163.37x76.71x8.13mm आहे आणि फोनचं वजन 213 ग्राम आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »