iQOO Neo 10 Pro+ मधील फीचर्सची माहिती आली समोर;पहा अपडेट्स

फोनबाबत ब्रॅन्ड ने दिलेल्या माहितीच्या अन्य पोस्ट मध्ये iQOO Neo 10 Pro+ मध्ये थर्मल मॅनेजमेंट आणि हीट डिसिपेशनसाठी सर्वात मोठा 7K “Ice Vault” व्हेपर कूलिंग चेंबर असेल.

iQOO Neo 10 Pro+ मधील फीचर्सची माहिती आली समोर;पहा अपडेट्स

Photo Credit: iQOO

iQOO Neo 10 Pro+ 20 मे दिवशी होणार लॉन्च; पहा फोनमधील स्पेसिफिकेशन्स

महत्वाचे मुद्दे
  • iQOO Neo 10 Pro+ मध्ये octa core Snapdragon 8 Elite SoC असणार
  • Neo 10 Pro+ मध्ये 1.5mm साइड बेझल आणि ग्लास बॅक पॅनेलसह 2K डिस्प्ले असेल
  • BMW M Motorsport edition, सह उपलब्ध होणारा हा पहिला iQOO Neo series phone
जाहिरात

iQOO Neo 10 Pro+ चीन मध्ये 20 मे दिवशी लॉन्च होणार आहे. त्याच्या सोबत iQOO Pad 5 series, iQOO Watch 5, iQOO TWS Air 3 लॉन्च होणार आहे. नोव्हेंबर2024 मध्ये लॉन्च झालेल्या standard iQOO Neo 10 आणि Neo 10 Pro variants सोबत हा फोन असणार आहे. आगामी Neo 10 Pro+ smartphone मध्ये Snapdragon 8 Elite SoC आणि 2K display आहे. आता कंपनीकडून रॅम, स्टोरेज आणि फोनबद्दलचे काही तपशील समोर आले आहेत.

iQOO Neo 10 Pro+ ची महत्त्वाची स्पेसिफिकेशन्स काय?

कंपनीकडून यापूर्वी देण्यात आलेल्या माहितीनुसार, iQOO Neo 10 Pro+ मध्ये octa core Snapdragon 8 Elite SoC असणार आहे. त्याबाबतची माहिती Weibo post मध्ये कंपनी ने दिली आहे. फोनमधील चीपसेट ही iQOO's Blue Crystal technology ने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन LPDDR5x Ultra RAM आणि UFS 4.1 storage ला सपोर्ट करणारा आहे. फोनला AnTuTu benchmark test मध्ये 3,311,557 points स्कोअर आहे. Weibo post नुसार, BMW M Motorsport edition, सह उपलब्ध होणारा हा पहिला iQOO Neo series phone असेल.

फोनबाबत ब्रॅन्ड ने दिलेल्या माहितीच्या अन्य पोस्ट मध्ये iQOO Neo 10 Pro+ मध्ये थर्मल मॅनेजमेंट आणि हीट डिसिपेशनसाठी सर्वात मोठा 7K “Ice Vault” व्हेपर कूलिंग चेंबर असेल, जो कूलिंग कार्यक्षमता 15 टक्क्यांनी सुधारण्याचा दावा करतो. यापूर्वी, iQOO ने खुलासा केला होता की आगामी Neo 10 Pro+ मध्ये 1.5mm साइड बेझल आणि ग्लास बॅक पॅनेलसह 2K डिस्प्ले असेल. तो Shi Guang White, Shadow Black, आणि Super Pixel रंगांमध्ये उपलब्ध असेल. नंतरच्या पर्यायाचे "prism pixel design" BMW M मोटरस्पोर्टच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे.

जुन्या अहवालांनुसार iQOO Neo 10 Pro+ मध्ये 6.82-इंचाचा फ्लॅट OLED स्क्रीन असण्याची शक्यता आहे. त्याच्या मागे दोन 50-मेगापिक्सेल कॅमेरे असण्याची अपेक्षा आहे. यात 120W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी असू शकते. हँडसेटमध्ये 16GB रॅम असू शकतो आणि तो Android 15-आधारित OriginOS 5 सह येऊ शकतो.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
  2. एअरटेल नेटवर्क पुन्हा ठप्प, देशभरात लाखो ग्राहक हैराण
  3. Honor Magic V Flip 2 मध्ये 200MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, पहा अन्य स्पेसिफिकेशन्स काय?
  4. 2 सप्टेंबरला बेंगळुरूमध्ये उघडणार ॲपलचे पहिले शोरूम
  5. Google Pixel 10 Pro Fold 5G मध्ये नवा टेन्सर G5 प्रोसेसर, 8-इंच फोल्डेबल डिस्प्ले
  6. Tensor G5 चिप, AI कॅमेरा टेक्नॉलॉजीसह Google Pixel 10 Series भारतामध्ये लाँच
  7. एअरटेलने हटवला 249 चा रिचार्ज प्लॅन; 24 दिवसांची वैधतेचा होता हा प्लॅन
  8. भारतात Redmi 15 5G प्रिमियर फीचर्स सह लॉन्च; किंमत 14,999 पासून सुरू
  9. Honor X7c 5G भारतात अधिकृतपणे लॉन्च; पहा या पॉवरपॅक्ट फोन मधील दमदार फीचर्स
  10. Airtel ची ग्राहकांना खास भेट! 6 महिन्यांसाठी Apple Music Subscription मिळणार अगदी मोफत
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »