Lava Agni 3 5G स्मार्टफोन मधेय आयफोन 16 सीरीज प्रमाणे 'हे' फीचर मिळणार असल्याची चर्चा

स्वदेशी स्मार्टफोन ब्रॅन्ड Lava आता त्यांचा नवा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीमध्ये आहे. सध्या त्याची झलक एका टीझर द्वारा दाखवण्यात आली आहे

Lava Agni 3 5G स्मार्टफोन मधेय आयफोन 16 सीरीज प्रमाणे 'हे' फीचर मिळणार असल्याची चर्चा

Photo Credit: Lava

Lava Agni 3 5G could run on MediaTek Dimensity 7300 SoC

महत्वाचे मुद्दे
  • Lava Agni 3 5G स्मार्टफोन 4 ऑक्टोबरला दुपारी 12 ला लॉन्च होणार आहे
  • Lava Agni 2 5G मागील वर्षी मे महिन्यात आला होता आता त्याच्यापुढील फोन
  • Lava Agni 3 5G स्मार्टफोन अमेझॉन वर विक्रीसाठी खुला होणार आहे
जाहिरात

Lava Agni 3 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लॉन्च होणार आहे. या स्वदेशी स्मार्टफोन ब्रॅन्डने X वर त्याबाबत घोषणा केली आहे. आगामी 5 जी फोनच्या टीझर मध्ये रेअर डिझाईन आणि कॅमेर्‍याची माहिती देण्यात आली आहे. Lava चा हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे तर त्यामध्ये 50 मेगापिक्सेल रेअर कॅमेरा सेटअप आहे. हा स्मार्टफोन अमेझॉन वर विक्रीसाठी खुला होणार आहे. तर Lava Agni 3 5G मध्ये MediaTek's Dimensity 7300 SoC असण्याची शक्यता आहे. Lava Agni 3 हा स्मार्टफोन 4 ऑक्टोबर दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध असणार आहे. या मोबाईल चा लॉन्च इव्हेंट YouTube वर लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे. टीझर मध्ये दाखवण्यात आलेल्या टीझर नुसार त्याचा कॅमेरा चौकोनी आहे.

Lava Agni 3 5G हा स्मार्टफोन 6.78-inch full-HD display असणारा आहे. 120Hz refresh rate आहे. तर MediaTek Dimensity 7300 SoC वर चालणार आहे.

Lava Agni 2 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन काय होती?

Lava Agni 3 5G हा Lava Agni 2 5G चा अपग्रेड केलेला स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.78-inch फूल एच डी (2220x1080 pixels) curved AMOLED display असणारा फोन आहे. यामध्ये MediaTek Dimensity 7050 SoC आहे. तर रॅम 6GB आहे. या हॅन्डसेट मध्ये 50-megapixel quad rear camera आहे. तर 4,700mAh बॅटरी आहे आणि या स्मार्टफोनला 66W charging सपोर्ट आहे.

मीडीया रिपोर्ट्स नुसार, Agni 3 च्या कॅमेर्‍याचा विचार करता quad camera setup या स्मार्टफोन मध्ये असू शकतो. त्यामध्ये 64MP primary shooter आणि
8MP ultra wide, 2MP macro shooter आणि 2MP depth sensor असू शकतो. iPhone 16 series च्या धर्तीवर या फोन मध्येही एका बाजूला 'Action Button' असू शकतं अशी चर्चा आहे.

Agni 3 च्या किंमती बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्याचा अंदाज लावला तर Agni 2प्रमाणेच हा देखील 25 हजारांच्या रेंज मध्ये असणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन OnePlus Nord CE 4, Vivo T3 Pro आणि नव्याने लॉन्च झालेल्या Motorola Edge 50 Neo ला बाजारात टक्कर देणार आहे.

ces_story_below_text

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Realme 16 Pro+ 5G ची चिपसेट, डिस्प्ले आणि इतर फीचर्स भारतात फोन लॉन्चपूर्वी जाहीर
  2. WhatsApp ने 2026 फीचर्स केले रोलआउट; स्टेटस टूल्समध्ये बदल सोबत नवीन स्टिकर्स मिळणार,पहा अपडेट
  3. TCL Note A1 NxtPaper, AI पॉवर्ड स्मार्ट ई-नोट दाखल
  4. Samsung Galaxy S26 Ultra मध्ये नवीन लेन्स तंत्रज्ञानासह सुधारित कॅमेरा मिळणार? पहा अपटेड्स
  5. Oppo Find N6 मध्ये 200MP कॅमेरा सेन्सर, फोटो सुधारणा अपेक्षित
  6. Amazon ने जाहीर केला Get Fit Days Sale 2026; फिटनेस बँड्स व उपकरणांवर दमदार ऑफर्स
  7. लाँचआधीच Oppo Find X9s चे कॅमेरा तपशील समोर; ड्युअल 200MP सेटअपचा समावेश
  8. लाँचआधीच Realme 16 Pro+ चे कॅमेरा, बॅटरी आणि चिपसेट तपशील आले समोर
  9. Vivo X300 Ultra युरोपमध्ये सर्टिफाईड, चीन लाँचची तयारी सुरू
  10. Exynos 5410 मॉडेमसह Samsung Galaxy S26 मध्ये नेटवर्कशिवाय कॉलिंग शक्य
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »