Amazon वर Lava Agni 4 स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर उपलब्ध
Lava ने गेल्या वर्षी Lava Agni 4 लॉन्च केला होता. सध्या या स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे. तुम्ही लावाचा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी फायदेशीर ठरू शकते. Agni 4 मध्ये MediaTek Dimensity 8350 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळते. फोन OIS सपोर्टसह येतो आणि त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. तसेच, सेल्फीसाठीही 50MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सध्या बाजारात जवळपास सर्व स्मार्टफोनच्या किमती वाढताना दिसत असताना, Lava Agni 4 सवलतीच्या किमतीत एक चांगली डील ठरू शकते.
Lava Agni 4 चा 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 27,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. ICICI Bank आणि HDFC Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4,000 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे या फोनची किंमत 23,999 रुपयांपर्यंत कमी होते. याशिवाय, एक्सचेंज ऑफरमध्ये जुना किंवा सध्या वापरत असलेला फोन दिल्यास 26,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, एक्सचेंज ऑफरचा लाभ हा दिल्या जाणाऱ्या फोनची स्थिती आणि मॉडेल यावर अवलंबून असेल. हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल हा Agni 4 च्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, ड्युअल सिम, ब्लूटूथ 5.4, Wi-Fi 6, OTG सपोर्ट, GPS, NFC आणि USB Type-C पोर्टचा समावेश आहे.
(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)
जाहिरात
जाहिरात
Vivo X500 Pro Max Leak Hints at 200-Megapixel Periscope Camera Upgrade
Lenovo Tab Plus Gen 2 Launched in India With JBL Speakers and 10,200mAh Battery, New LOQ Monitors Tag Along