Moto G96 5G 9 जुलैला भारतात होणार लॉन्च; दमदार फीचर्स आणि स्टायलिश लुकची चर्चा

Moto G96 5G डिस्प्ले Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह येणार आहे.

Moto G96 5G 9 जुलैला भारतात होणार लॉन्च; दमदार फीचर्स आणि स्टायलिश लुकची चर्चा

Photo Credit: Motorola

Moto G96 5G अॅशले ब्लू, ड्रेस्डेन ब्लू, कॅटलिया ऑर्किड आणि ग्रीनर पाश्चर्स शेड्समध्ये येईल

महत्वाचे मुद्दे
  • Moto G96 5G भारतामध्ये 9 जुलैला लॉन्च होणार
  • हा फोन Qualcomm च्या Snapdragon 7s Gen 2 chipset वर चालणार
  • फोनच्या टॉप एंड मॉडेल मध्ये 12 GB RAM आणि 256 GB storage चा समावेश आहे
जाहिरात

Moto G96 5G भारतामध्ये वर्षअखेरी पर्यंत लॉन्च होण्याच्या तयारी मध्ये आहे. लाँच तारखेची घोषणा करण्यासोबतच, कंपनीने आगामी हँडसेटची अनेक प्रमुख फीचर्स आणि फोन कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध होईल याची माहिती दिली आहे. हा फोन Qualcomm च्या Snapdragon 7s Gen 2 chipset वर चालणार आहे आणि त्यात dual rear camera setup असेल, ज्यामध्ये 50-megapixel Sony Lytia 700C sensor चा समावेश असेल. या स्मार्टफोनमध्ये वॉटर टच सपोर्टसह curved display आणि IP68-रेटेड डस्ट आणि वॉटर-रेझिस्टंट बिल्ड असेल. याआधीच्या लीक्समध्ये फोनच्या इतर अपेक्षित स्पेसिफिकेशन्सबद्दलही संकेत मिळाले आहेत. Motorola India ने त्यांच्या पुढील मिड रेंज 5G स्मार्टफोन मध्ये Moto G96 5G ची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन 9 जुलै रोजी भारतात लाँच करण्याची अधिकृतपणे पुष्टी केली आहे.

Moto G96 5G ची काय असतील स्पेसिफिकेशन्स?

Moto G96 5G मध्ये 6.67-inch 144 Hz 3D curved pOLED display आहे. त्याला Corning Gorilla Glass 5 चे प्रोटेक्शन आहे. सोबत फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 SoC आहे. फोनमध्ये 50 MP Sony LYT-700C OIS main camera आहे. फोन मध्ये IP68 rating असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. फोनच्या पूर्वीच्या रिपोर्ट्सनुसार, Moto G96 5G मध्ये
8 MP ultra-wide secondary camera आहे तर सेल्फी साठी 32 MP front camera आहे. फोनमध्ये 5,500 mAh बॅटरी असणार आहे. ज्याला 68W fast charging सपोर्ट असणार आहे. वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करेल की नाही याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट नाही. फोनच्या टॉप एंड मॉडेल मध्ये 12 GB RAM आणि 256 GB storage चा समावेश आहे. जर मोटोरोलाने या वर्षी आपला पॅटर्न फॉलो केला, तर फोनमध्ये 3 वर्षांचे promised OS updates आणि 4 वर्षांचे security patches असू शकतात.

Moto G96 5G ची किंमत काय असू शकते?

Moto G96 5G ची किंमत 22,990 रूपये असण्याचा अंदाज आहे. फोनची नेमकी किंमत अद्याप समोर आलेली नाही. परंतू फोन जशी फोनची लॉन्च डेट समोर येणार तशी फोनची किंमत आणि अन्य अपडेट्स समोर येणार आहेत. iQOO Z10 आणि Realme P3 या फोनच्या किंमतींच्या रेंज मध्येच Moto G96 5G ची देखील किंमत असू शकते असा अंदाज आहे.

Moto G96 5G कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध असेल?

Moto G96 5G हा स्मार्टफोन Ashleigh Blue, Greener Pastures, Cattleya Orchid, आणि Dresden Blue या रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Vodafone Idea ने 5G सेवा 23 नव्या शहरांमध्ये होणार सुरू; प्रीपेड प्लान्स, डेटा स्पीड जाणून घ्या
  2. Moto G96 5G 9 जुलैला भारतात होणार लॉन्च; दमदार फीचर्स आणि स्टायलिश लुकची चर्चा
  3. iQOO 13 Green Edition भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत; पहा फीचर्स, किंमती काय?
  4. AI+ चे Nova 5G व Pulse स्मार्टफोन भारतात 8 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार
  5. Tecno चा Pova 7 5G स्मार्टफोन 4 जुलैला भारतात लॉन्च; मिळणार AI असिस्टंट आणि आधुनिक UI
  6. Vi चा धमाकेदार फॅमिली प्लॅन: 2 सिम, Netflix आणि Choice Benefits केवळ ₹871 मध्ये
  7. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  8. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  9. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  10. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »