Nothing Phone 3a, Phone 3a Pro ची भारतामध्ये किंमत काय? पहा खरेदीसाठी धमाकेदार ऑफर काय?

GEV प्रोग्राम 2020 नंतर लाँच झालेल्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि 2018 नंतर लाँच झालेल्या आयफोन मॉडेल्सवर लागू आहे

Nothing Phone 3a, Phone 3a Pro ची भारतामध्ये किंमत काय? पहा खरेदीसाठी धमाकेदार ऑफर काय?

Photo Credit: Nothing

नथिंग फोन ३ए प्रो हे कंपनीच्या लाइनअपमधील उच्च श्रेणीचे मॉडेल आहे.

महत्वाचे मुद्दे
  • नथिंग फोन ३ए प्रो हे कंपनीच्या लाइनअपमधील उच्च श्रेणीचे मॉडेल आहे.
  • Nothing Phone 3a Pro, Phone 3a खरेदीसाठी फ्लिपकार्ट कडून Guaranteed Exc
  • डिलिव्हरीच्या वेळी एक्सचेंज करायच्या फोनचे मूल्यांकन न करता कोणत्याही कपा
जाहिरात

Nothing Phone 3a series नुकत्याच Barcelona मध्ये झालेल्या Mobile World Congress (MWC) मध्ये 4 मार्चला रीलीज करण्यात आला आहे. या मध्ये फोनचे दोन मॉडेल्स आहेत. Nothing Phone 3a Pro आणि Phone 3a लॉन्च करण्यात आले आहेत. हा फोन भारतामध्ये 11 मार्च पासून विक्रीसाठी खुला होणार आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून ग्राहकांना तो खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टने त्यासाठी Guaranteed Exchange Value (GEV) programme जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहक त्यांचा जुना फोन देऊन नवा Nothing Phone 3a Pro किंवा Phone 3a खरेदी करू शकतात. ग्राहकांना त्यांच्या फोनची बेस्ट व्हॅल्यू मिळणार आहे.

Nothing Phone 3a Series साठी Guaranteed Exchange Value Programme

Flipkart,च्या माहितीनुसार GEV programme द्वारा ग्राहकांना अधिकाधिक trade-in value त्यांच्या जुन्या मोबाईल साठी दिली जाईल. Flipkart,वर लॉग ईन करून ग्राहक त्यांना जे मॉडेल खरेदी करायचं आहे त्याची निवड करू शकतात. त्यांच्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू देखील पाहू शकतात. जी पुढे auto-applied होईल.

एरवी फ्लिपकार्ट कर्मचारी डिलिव्हरीच्या वेळी एक्सचेंज करायच्या फोनचे मूल्यांकन करतात, परंतु GEV प्रोग्रामच्या बाबतीत असे होणार नाही.

कंपनी कडून चेकआउटच्या वेळी ग्राहकांना मिळणारी खात्रीशीर एक्सचेंज व्हॅल्यू हीच अंतिम असेल. डिलिव्हरीच्या वेळी कोणतेही मूल्यांकन किंवा कपात केली जाणार नाही. सुरळीत एक्सचेंज सुनिश्चित करण्यासाठी, डिलिव्हरी कर्मचारी स्मार्टफोनच्या मेक आणि मॉडेलची पुष्टी करण्यासाठी डायग्नोस्टिक्स अॅप वापरणार आहेत.

दरम्यान GEV प्रोग्राम 2020 नंतर लाँच झालेल्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि 2018 नंतर लाँच झालेल्या आयफोन मॉडेल्सवर लागू आहे.

Nothing Phone 3a, Phone 3a Pro ची किंमत

Nothing Phone 3a ची भारतामधील किंमत 8GB + 128GB configuration,साठी Rs. 24,999 आहे. Rs. 24,999 व्हेरिएंट साठी Rs. 26,999 आहे. हा फोन Black, Blue, आणि White रंगांमध्ये उपलब्ध आहे. Nothing Phone 3a Pro price ची किंमत 8GB + 128GB option साठी Rs. 29,999 पासून सुरू होते. त्याच्या 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटला 8 जीबी आणि 12 जीबी रॅम पर्यायांसह जोडले आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 31,999 आणि 33,999 रुपये आहे. हा फोन काळ्या आणि राखाडी रंगात उपलब्ध होणार आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. ‘डाकॉइट: अ लव्ह स्टोरी’ ओटीटीवर प्रदर्शित; आदिवी शेष आणि मृणाल ठाकूरचा अ‍ॅक्शन-रोमँस चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार
  2. Amazon Great Summer Sale 2026: Samsung, LG आणि Panasonic एअर कंडिशनरवर आकर्षक ऑफर्स जाहीर
  3. गुगलचा भारतात AI आधारित ‘हेल्थ कोच’ लॉन्च; Fitbit अ‍ॅप आता ‘Google Health’
  4. OPPO Find X9 Ultra आणि Find X9s भारतात लवकरच लॉन्च; Amazon, Flipkart वर मायक्रोसाइट्स लाइव्ह
  5. Samsung Galaxy Watch मध्ये बेशुद्धीचा अंदाज आणि पडणे टाळण्याचे फीचर
  6. Motorola Razr Fold भारतात 13 मे रोजी लॉन्च होणार; रंग, RAM आणि स्टोरेज व्हेरिएंट्सची माहिती समोर
  7. OnePlus Nord CE 6 Lite भारतात Nord CE 6 सोबत लॉन्च; किंमत, सेल डेट आणि फीचर्स जाहीर
  8. John Ternus यांच्या नेतृत्वाखाली Apple फोल्डेबल iPad, AI स्मार्ट होम डिव्हाइसेस,टचस्क्रीन MacBook होणार लॉन्च
  9. Vivo X500 Pro Max मध्ये 200MP पेरिस्कोप कॅमेरा आणि 50MP LOFIC सेन्सर मिळण्याची शक्यता
  10. गुगलच्या AI Mode आणि AI Overviews ला मोठे अपडेट; Expert Advice, Link Preview आणि Deep Dive फीचर्सची भर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »