OnePlus 13 चीन नंतर आता भारतामध्ये कधी येणार? पहा कंपनीने दिलेले अपडेट्स

OnePlus 13 मध्ये micro-fibre vegan leather असणार आहे

OnePlus 13 चीन नंतर आता भारतामध्ये कधी येणार? पहा कंपनीने दिलेले अपडेट्स

Photo Credit: OnePlus 13

OnePlus 13 मध्ये Hasselblad-tuned ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus 13 हा चीन मध्ये 31 ऑक्टोबरला लॉन्च
  • OnePlus 13 हा स्मार्टफोन भारतामध्ये आणि ग्लोबल मार्केट मध्ये जानेवारी
  • Arctic Dawn, Black Eclipse,आणि Midnight Ocean रंगामध्ये फोन येणार
जाहिरात

OnePlus 13 हा चीन मध्ये 31 ऑक्टोबरला लॉन्च झाला आहे. आता भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. फोन निर्मिती कंपनीने या नॉन फोल्डेबल फ्लॅगशीप हॅन्डसेटच्या लॉन्चची टाईमलाईन आता समोर आली आहे. हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये पहिल्यांदा Snapdragon 8 Elite SoC चा समावेश असणार आहे. OnePlus च्या या फोनमध्ये Hasselblad-tuned optics आहे. तर 50-megapixel ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे.

OnePlus 13 कधी होणार लॉन्च?

OnePlus 13 हा स्मार्टफोन भारतामध्ये आणि ग्लोबल मार्केट मध्ये जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होणार आहे. कंपनीने त्याबाबतचे प्रेस रिलीज जारी केले आहे हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. Arctic Dawn, Black Eclipse,आणि Midnight Ocean रंगामध्ये फोन येणार आहे. या फोनमध्ये मागील बाजूला मायक्रो फायबर वेगन लेदर असणार आहे.

OnePlus 13 हा IP68+69 रेटेड असणार आहे. त्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहील. येत्या आठवड्यामध्ये या फोनची अन्य फीचर्स समोर येणार आहेत. कंपनीने मायक्रोसाईट सुरू केली आहे आणि त्यावर “Coming Soon” चा मेसेज दिसत आहे.

OnePlus 13 ची स्पेसिफिकेशन काय?

OnePlus 13 च्या चीन मधील मोबाईल मध्ये 6.82-inch Quad-HD+ (1440x3168 pixels) LTPO AMOLED screen आणि 120Hz refresh rate आहे. तर peak brightness level of 4,500 nits आहे आणि Dolby Vision support आहे. यामध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Elite chipset आहे. त्याला 24GB of LPDDR5X RAM आणि 1TB of UFS 4.0 storage सोबत जोडले होते.

फोनमध्ये Hasselblad-tuned ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. 50-megapixel primary camera आहे. यामध्ये optical image stabilisation आहे. 50-megapixel ultrawide camera आणि 50-megapixel periscope telephoto camera आहे. यामध्ये सेल्फीसाठी 32-megapixel shooter आहे.

OnePlus 13 मध्ये 6,000mAh बॅटरी आहे. चार्जिंग क्षमतांमध्ये 100W वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि काहींमध्ये पहिल्यांदाच magnetic wireless charging चा देखील पर्याय देण्यात आला आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. ₹३० हजारांखाली कोणता स्मार्टफोन ठरेल बेस्ट? Poco M8 Power, Vivo T5x 5G की OnePlus Nord CE 6 Lite – जाणून घ्या संपूर्ण तुलना
  2. भारतात एलजी २०२६ एआय टीव्ही सिरीज लॉन्च: ११५-इंचापर्यंतचा डिस्प्ले आणि AI प्रोसेसर, किंमत ₹२०,००० पासून सुरू
  3. OnePlus N6x वर ₹१,५०० ची तगडी सूट! Amazon वर ७,०००mAh बॅटरीचा दमदार फोन आता आणखी स्वस्त
  4. कॉल ड्रॉपचा त्रास? आता थेट TRAI कडे करा तक्रार; नव्या MyCall अ‍ॅपमुळे नेटवर्क समस्यांवर ठेवता येणार नजर
  5. भारतात लॉन्च झाला Asus Chromebook CX15, जाणून घ्या प्राइस, स्पेसिफिकेशन
  6. UPI व्यवहार आता पूर्णपणे मोफत राहणार नाहीत? ₹२,००० पेक्षा जास्त पेमेंटवर शुल्क आकारण्याची तयारी
  7. Samsung Galaxy F70 Pro 5G vs OnePlus N6 vs Poco M8 5G: कोणता फोन बेस्ट आहे?
  8. जपानने बनवला 'मानवी रेफ्रिजरेटर'; हर्ष गोएंका म्हणाले, "हे रस्त्याच्या कडेला सर्वत्र हवे!"
  9. OnePlus N6x vs Vivo T5 Lite 5G vs Tecno Spark 50 5G: ₹20000 मध्ये कोणता फोन आहे बेस्ट?
  10. Freedom Sale सुरू होण्याआधीच Galaxy S25 FE 5G वर जबरदस्त डील!
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »