OnePlus Ace 5 Pro हा फोन Starry Purple, Submarine Black, आणि White Moon Porcelain-Ceramic रंगांमध्ये उपलब्ध आहे
Photo Credit: OnePlus
Snapdragon 8 Elite सह OnePlus Ace 5 Pro
OnePlus Ace 5 Pro आणि OnePlus Ace 5 हे स्मार्टफोन चीन मध्ये गुरूवारी लॉन्च झाले आहेत. नव्या OnePlus Ace series हॅन्डसेट मध्ये 16GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे. फोन मध्ये 6.78-inch डिस्प्ले आणि 1.5K resolution आहे. प्रो मॉडेल मध्ये Snapdragon 8 Elite Extreme Edition SoC आहे. Ace 5 मध्ये Snapdragon 8 Gen 3 चीप आहे. यामध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये 50-megapixel primary sensor आहे. OnePlus Ace 5 Pro आणि Ace 5 दोन्ही फोन चीन मध्ये विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत.
OnePlus Ace 5 Pro ची किंमत CNY 3,399 (roughly Rs. 39,000)आहे. ही किंमत 12GB RAM + 256GB storage model साठी आहे. तर 16GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB, आणि 16GB + 1TB models साठी किंमती अनुक्रमे CNY 3,699 (roughly Rs. 42,000), CNY 3,999 (roughly Rs. 46,000), CNY 4,199 (roughly Rs. 49,000), आणि CNY 4,699 (roughly Rs. 54,000) आहे.
स्मार्टफोन हा Starry Purple, Submarine Black, आणि White Moon Porcelain-Ceramic रंगांमध्ये आहे. White Moon Porcelain-Ceramic Special Edition देखील असणार आहे त्याची किंमत CNY 4,299 (roughly Rs. Rs. 50,000) आहे. तर 16GB + 1TB storage model ची किंमत CNY 4,799 (roughly Rs. 56,000) आहे.
OnePlus Ace 5 च्या 12GB + 256GB मॉडेल साठी CNY 2,299 (roughly Rs. 26,000) मोजावे लागणार आहेत. हाच फोन 16GB + 256GB व्हेरिएंट साठी CNY 2,499 (roughly Rs. 29,000) मोजावे लागतील. 12GB + 512GB व्हेरिएंटसाठी CNY 2,799 (roughly Rs. 32,000) मोजावे लागतील.
16GB + 512GB model आणि 16GB + 1TB storage models साठी CNY 3,099 (roughly Rs. 38,000) आणि CNY 3,499 (roughly Rs. 40,000) मोजावे लागतील. हा फोन Full Black, Celadon-Ceramic Special Edition आणि Gravitational Titanium रंगामध्ये मिळेल.
OnePlus Ace 5 Pro, OnePlus Ace 5 हे दोन्ही फोन ड्युअल सीम आहेत. Android 15 with ColorOS 15.0 वर चालतात. त्याची 6.78-inch full-HD+ (1,264x2,780 pixels) display आहे. फोनमध्ये metal middle frame आणि glass back आहे.
जाहिरात
जाहिरात
OnePlus Nord CE 6
Starts from ₹27,999
Vivo X300 FE
Starts from ₹79,999
Vivo Y51 Pro 5G
Starts from ₹23,920
HP 303D Laser Single Function Monochrome Printer
Starts from ₹13,999
HP MFP 323DNW Laser Multi Function Monochrome Printer
Starts from ₹21,999
HP 303DW Laser Single Function Wireless Monochrome Printer
Starts from ₹15,999
Infinix Note 60 Pro Pininfarina Edition Goes on Sale in India: Price, Offers, Features