OPPO भारतात K13x 5G लॉन्च करण्याच्या तयारीत; पहा काय असू शकतात फीचर्स

Oppo K13x 5G फोन ग्राहकांना Flipkart वर तसेच official e-store वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

OPPO भारतात K13x 5G लॉन्च करण्याच्या तयारीत; पहा काय असू शकतात फीचर्स

Photo Credit: Oppo

ओप्पो के१३एक्स ५जी मिडनाईट व्हायलेट आणि सनसेट पीच रंग पर्यायांमध्ये येईल

महत्वाचे मुद्दे
  • Oppo K13x 5G ची किंमत 16 हजार पेक्षा कमी असण्याचा अंदाज
  • स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 processor असण्याचा अंदाज
  • Oppo K13x 5G फोनमध्ये internal shock-absorption cushioning system असणार
जाहिरात

Oppo सध्या त्यांच्या फोनमधील नवी K series phone,लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे. Oppo K13x 5G लवकरच भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन भारतामध्ये किफायतशीर दरामध्ये लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. अपेक्षेनुसार त्याची किंमत 15 हजार च्या आसपास असू शकते. मात्र ओप्पो कडून अद्याप या फोनची लॉन्च डेट सांगण्यात आलेली नाही. मात्र हा फोन ग्राहकांना Flipkart वर तसेच official e-store वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. जसजसा या फोनचा लॉन्च जवळ येत आहे तसतसे Oppo K13x 5G बाबतचे लीक्स समोर आले आहेत.

Oppo K13x 5G लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. फोनमधील आकर्षक अपग्रेड्स, नवी फीचर्स आणि किंमती पाहता त्याची चर्चा वाढली आहे. Oppo K13x 5G चे काही फीचर्स, स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन Midnight Violet आणि Sunset Peach या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. फोनचा रेअर पॅनेल पाहता vertically-placed camera module आहे. dual-camera setup आहे सोबतच LED flash देखील आहे. आता कंपनीकडून या नव्या फोनची भारतामधील लॉन्च डेट जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

Oppo K13x 5G मध्ये काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Oppo K13x 5G ची किंमत 16 हजार पेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे. या फोनच्या RAM आणि storage variants बद्दल माहिती देण्यात आलेली नाही. मागील Oppo K12x,च्या तुलनेत या फोनची किंमत थोडी वाढलेली आहे. Oppo K12x,ची किंमत 6GB RAM and 128GB storage variants साठी Rs. 12999 आहे.

Oppo K13x ची बॅटरी लाईफ देखील दमदार असणार आहे. फोन बाबतच्या अफवांचा विचार करता या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 processor असण्याचा अंदाज आहे. 6000mAh battery आणि 45W charging support असण्याचा अंदाज आहे. Oppo K13x मध्ये 50MP main cameraआणि 2MP secondary camera आहे.

रिपोर्ट्सनुसार, Oppo K13x हा फोन डॅमेज-प्रूफ 360 बॉडीसह येणार आहे. उंचीवरून पडल्यानंतरही फोन खराब होणार नाही.कॅमेरा सेटअपच्या शेजारी AI कॅमेरा सिस्टमचा मजकूर पाहता येईल. या फोनमध्ये internal shock-absorption cushioning system आहे तर high-strength aluminum alloy frame देखील आहे.
फोन खरेदी करताना अतिरिक्त संरक्षणासाठी प्रत्येक K13x डिव्हाइसमध्ये “Anti-Drop Shield Case” देखील असणार आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. स्नॅपड्रॅगन 8 एलिट Gen 5 आणि 200MP Hasselblad कॅमेऱ्यांसह OPPO Find X9 Ultra भारतात लॉन्च
  2. Amazon Alexa+ आता AI-आधारित पॉडकास्ट एपिसोड तयार करू शकणार
  3. Amazon Fire TV Stick HD भारतात लॉन्च; Xbox Cloud Gaming सपोर्टसह दमदार फीचर्स
  4. Google I/O 2026 मध्ये Gemini 3.5 Flash, Omni, Spark AI Agent, Universal Cart ची घोषणा
  5. Xiaomi 17T Pro ची रिटेल लिस्टिंग लीक; लॉन्चपूर्वी महत्त्वाचे फीचर्स समोर
  6. Moto G37 आणि Moto G37 Power भारतात लॉन्च; Dimensity 6400 चिपसेटसह 7,000mAh बॅटरी
  7. रेडमी टर्बो 5 भारतात जूनच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता; प्रमुख फीचर्स लीक
  8. यूट्यूबकडून AI डीपफेक ओळख साधन सर्व प्रौढ क्रिएटर्ससाठी उपलब्ध
  9. Amazon ग्रेट समर सेल 2026: OnePlus 15, OnePlus 13 आणि OnePlus Nord 6 स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स
  10. एआय पुनर्रचनेत Meta कडून १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »