Oppo Find X9 Pro आणि Find X9 दोन्ही फोन्स मध्ये पाच OS upgrades आणि सहा वर्षांचे security patches आहेत.
Photo Credit: Oppo
Find X9 तीन, तर X9 Pro दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे
Oppo Find X9 Pro आणि Find X9 हे स्मार्टफोन स्पेनच्या Barcelona मध्ये एका हार्डवेअर इव्हेंट द्वारा लॉन्च झाले आहेत. हा स्मार्टफोन चीन मध्ये 16 ऑक्टोबरला लॉन्च झाला आहे. भारतात हा फोन लॉन्च होताना देखील त्याच स्पेसिफिकेशन्सच्या आधारावर लॉन्च होतील असा अंदाज आहे. Oppo Find X9 आणि Find X9 Pro यांची स्पेसिफिकेशन्स, किंमत, फीचर्स यांच्याबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी!
Oppo Find X9 Pro आणि Find X9 हे दोन्ही फोन MediaTek Dimensity 9500 प्रोसेसर वर चालतात. त्यामध्ये 16GB of RAM आणि 1TB of storage पर्यायाचा समावेश आहे. हा स्मार्टफोन Oppo च्या ColorOS 16 skin वर चालतो जो Android 16 वर बेस्ड आहे. दोन्ही फोन्स मध्ये पाच OS upgrades आणि सहा वर्षांचे security patches आहेत.
Find X9 Pro मध्ये 6.78-इंचाचा 1.5K LTPO पॅनेल आहे, तर स्टँडर्ड Find X9 मध्ये अधिक कॉम्पॅक्ट 6.59-इंचाचा 1.5K स्क्रीन आहे. दोन्हीमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,600 nits पीक ब्राइटनेस आहे.
Find X9 मध्ये 50 MP मेन सेन्सर, 50 MP telephoto, 50 MP अल्ट्रावाइड आणि 32MP सेल्फी शूटर आहे. Find X9 Pro मध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा, 50 MP अल्ट्रावाईड, 200MP periscope telephoto आणि 50MP फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.
Find X9 मध्ये 7025mAh बॅटरी आहे, तर Find X9 Pro मध्ये 7,500mAh बॅटरी आहे. दोन्ही 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात. प्रत्येक मॉडेलमध्ये Bluetooth, AI LinkBoost, Wi-Fi 7, GPS,आणि USB 3.2 Gen 1 Type-C ports आहेत. Find X9 स्पेस ब्लॅक, वेल्वेट रेड, टायटॅनियम ग्रे रंगात उपलब्ध आहे. Find X9 Pro सिल्क व्हाइट आणि टायटॅनियम चारकोल रंगात येईल.
Oppo Find X9 Pro ची किंमत EUR 1,299 आहे (अंदाजे Rs 1,33,000) आहे. Oppo Find X9 ची किंमत EUR 999 आहे (अंदाजे Rs 1,03,000) आहे.
जाहिरात
जाहिरात