पाहूया काय आहेत, Poco M6 Plus 5G आणि Poco Buds X1 ची किंमत, वैशिष्ट्ये आणि ऑफर्स

Poco M6 Plus 5G ह्या स्मार्टफोनमध्ये दोन मागील कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 108 मेगापिक्सलचा असून 3x झूम कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोन सोबत Poco Buds X1 सुद्धा लॉन्च झाला आहे.

पाहूया काय आहेत, Poco M6 Plus 5G आणि Poco Buds X1 ची किंमत, वैशिष्ट्ये आणि ऑफर्स

Photo Credit: Gadgets 360

महत्वाचे मुद्दे
  • Poco M6 Plus हा 5G स्मार्टफोन Android 14 वर आधारित HyperOS सह बनविण्यात आ
  • Poco Buds X1 हा फक्त एकाच टायटॅनियम रंगात खरेदी करता येऊ शकतो.
  • भारतात गेल्या आठवड्यातच Poco M6 Plus 5G आणि Poco Buds X1 लॉन्च करण्यात आल
जाहिरात
Poco ह्या स्मार्टफोन कंपनीने नुकताच Poco M6 Plus 5G हा स्मार्टफोन आणि Poco Buds X1 हे इअरफोन्स भारतात मागच्याच आठवड्यात लॉन्च केले आहेत. आणि हे दोन्ही गॅजेट्स तुम्ही फ्लिपकार्ट वरील सेल मध्ये खरेदी देखील करू शकता. TWS इयरफोन्स आणि 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासोबत Poco काय नवीन घेऊन आला आहे, आपल्या ह्या गॅजेट्स मध्ये ह्याबाबत आवश्यक माहिती आज आम्ही तुम्हाला आमच्या ह्या ब्लॉगमध्ये देणार आहोत. 

Poco M6 Plus 5G ची वैशिष्ट्ये

 Poco M6 Plus 5G चा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसोबत 6.79 इंचाचा आहे. ह्या स्मार्टफोनचा प्रोसेसर Qualcomm Snapdragon 4 Gen2 AE ने समर्थित आहे. ह्याच्या रॅम प्रकारांमध्ये 6GB आणि 8GB असे दोन प्रकार आणि 128GB च्या स्टोरेज क्षमतेसोबत उपलब्ध आहे.

Poco M6 Plus 5G ह्या स्मार्टफोनमध्ये दोन मागील कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 108 मेगापिक्सलचा असून 3x झूम कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनची बॅटरी ही 5030 mAh ची असून 33 वॅट च्या चर्गिंगचे समर्थन करते. 

Poco Buds X1 ची वैशिष्ट्ये

Poco Buds X1 मध्ये 12.4mm चे डायनॅमिक टायटॅनियम ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये स्पर्शाद्वरे नियंत्रण ठेवता येऊ शकते. 40dB संकरित सक्रिय आवाज रद्दीकरण म्हणजेच ANC चे समर्थन आणि AI-समर्थित ENC सह क्वाड-माइक प्रणाली देण्यात आली आहे. चार्जिंग केसमध्ये 480mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर 36 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देण्यास समर्थ आहे. इअरर्फोन्समध्ये ऑडिओ कोडेक्ससाठी ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. इअरर्फोन्समध्ये धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधासाठी IP54-रेट केलेले बिल्ड सुद्धा देण्यात आले आहे.

Poco M6 Plus 5G आणि Poco Buds X1 ची किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स

Poco M6 Plus 5G हा स्मार्टफोन मिस्टी लवेंडर, आइस सिल्व्हर आणि ग्राफाईट ब्लॅक अशा तीन रंगांसोबत आणि दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहेत. आपण ते प्रकार आणि त्यांची किंमत पाहुयात. 
  • 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 11,999 रुपये. 
  • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 13,499 रुपये. 

ह्या दोन्ही स्मार्टफोनला खरेदी करण्यासाठी सर्व बँकांच्या कार्डवर 1000 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. शिवाय 6GB रॅम च्या स्मार्टफोन प्रकारावर 500 रुपयांच्या कूपन सोबत अधिक सूट मिळणार आहे, ज्यासाठी तुम्हाला हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून खरेदी करणे आवश्यक आहे. 

Poco Buds X1 कडे जर आपण पाहिलं, तर तो फक्त टायटॅनियम ह्या एकाच रंगामध्ये खरेदी करता येईल. आणि त्याची मूळ किंमत ही 1,799 रुपये असून त्यावर 100 रुपयांची सवलत सर्वत्र उपलब्ध असल्याने हे फक्त 1,699 मध्ये खरेदी करता येणार आहे.
 
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »