Photo Credit: Realme
Realme Narzo 80 Lite 5G क्रिस्टल जांभळा आणि ओनिक्स काळ्या रंगात उपलब्ध आहे
Realme कडून नवा स्मार्टफोन Narzo 80 Lite 5G भारतामध्ये लॉन्च केला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात या फोन कंपनी कडून Realme Narzo 80x आणि Narzo 80 Pro लॉन्च करण्यात आले आहेत. Realme Narzo 80 Lite 5G मध्ये price-sensitive smartphone खरेदीदारांसाठी अनेक आकर्षक पर्याय आहेत, ज्यामध्ये चांगला प्रोसेसर आणि कॅमेरा, पॉवरहाऊस बॅटरी आणि military-grade durability आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे आणि तो MediaTek Dimensity 6300 SoC ने सुसज्ज आहे. हा फोन 23 जून पासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा विविध रंगांच्या पर्यायांमध्ये येणारआहे आणि त्याची किंमत 10,499 रुपयांपासून सुरू होते. भारतीय युजर्ससाठी हा बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये एक नवा फोन आहे. Realme Narzo 80 Lite 5G दोन रंगांमध्ये येतो.
Realme Narzo 80 Lite 5G हा Android 15-based Realme UI 6.0 वर चालतो. त्यामध्ये 6.67-inch HD+ display,120Hz refresh rate, 83 percent NTSC आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 processor आहे. 6GB RAM आणि 128GB of storage पर्यंत आहे.
Realme Narzo 80 Lite 5G कॅमेरामध्ये f/1.9 अपर्चर आणि 5P लेन्ससह 32-मेगापिक्सेल ऑटोफोकस कॅमेरा समाविष्ट आहे. यात 15W चार्जिंग आणि USB टाइप-V चार्जिंग पोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे. इतर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G ड्युअल मॉडेल, 5GHz Wi-Fi सपोर्ट आणि Bluetooth 5.3 सपोर्ट समाविष्ट आहे. Realme Narzo 80 Lite 5G चे वजन 197 ग्रॅम आहे. ते IP63 धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहे आणि military-grade durability देखील आहे.
Realme Narzo 80 Lite 5G ची 4GB RAM ची भारतामधील किंमत Rs. 10,499 आहे. 6GB RAM + 128GB ची किंमत Rs. 11,499 आहे. हा फोन Crystal Purple आणि Onyx Black रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. भारतात 23 जून पासून हा स्मार्टफोन Amazon वर खरेदी करता येणार आहेत. विविध स्टोरेज मॉडेल्सवर 500 आणि 700 रुपयांची सूट देण्यात येत आहे, ज्यामुळे 4GB मॉडेल Rs. 10,000 पेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन रेंजमध्ये प्रभावीपणे येते.
जाहिरात
जाहिरात