Photo Credit: Redmi
Redmi 14C 5G हा भारतामध्ये सोमवारी लॉन्च झाला आहे. ग्लास बॅक पर्यायासह हा नवा 5 जी स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 6.88-inch display आणि 120Hz resolution आहे. दरम्यान Redmi 14C 5G या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 chipset आहे. तर 5,160mAh बॅटरीचा पर्याय आहे. या बजेट समार्टफोन मध्ये dual rear camera आहे. त्यामध्ये 50-megapixel primary sensor कॅमेरा आहे.
Redmi 14C 5G ची किंमत 9,999 रूपये आहे. ही किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज सह आहे. तर 4GB + 128GB आणि 6GB + 128GB व्हेरिएंट्सची किंमत 10,999 आणि 11,999 रूपये आहे. हा फोन Starlight Blue, Stardust Purple आणि Stargaze Black रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Redmi 14C 5G ची विक्री 10 जानेवारीला दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. हा फोन Amazon, Flipkart, Mi.com आणि Xiaomi च्या रिटेल स्टोअर्स वर उपलब्ध असणार आहे.
Redmi 14C 5G हा ड्युअल सीम फोन आहे. जो Android 14 सह HyperOS skin on top आहे. Redmiने दोन OS updates आणि four years of security updates ची खात्री दिली आहे. या फोनमध्ये 6.88-inch HD+ स्क्रीनआहे . डीस्प्ले ला TÜV Rheinland certification आहे. यामध्ये 4nm Snapdragon 4 Gen 2 SoC आहे जे 6GB of LPDDR4X RAM सोबत जोडलेले आहे. त्याची ऑनबोर्ड रॅम ही 12 जीबी पर्यंत unused storage च्या मदती ने वाढवता येऊ शकते.
Redmi 14C 5G मध्ये फोटो आणि व्हिडिओ साठी ड्युअल रेअर कॅमेरा आहे. ज्यात 50-megapixel primary camera, 8-megapixel selfie camera आहे. दरम्यान त्यांना IP52 rating असल्याने फोन धूळ आणि स्पॅल्श पासून सुरक्षित आहे.
Redmi 14C 5G मध्ये 5,160mAh बॅटरी सह 18W fast charging आहे. फोनसोबत 1999 चा 33W inbox charger आहे. एका चार्जिंग नंतर बॅटरी 21 दिवसांसाठी स्टॅन्डबाय आणि 139 तासांसाठी म्युझिक प्लेबॅक टाईम देते असा दावा करण्यात आला आहे.
जाहिरात
जाहिरात