Xiaomi India कडून Redmi Note 14 Pro+ च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्सची माहिती, पहा अपडेट्स

Redmi Note 14 Pro+ मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सेटअप असणार आहे. यामध्ये 50-megapixel telephoto camera असणार आहे

Xiaomi India  कडून Redmi Note 14 Pro+ च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्सची माहिती, पहा अपडेट्स

Photo Credit: Redmi

Redmi Note 14 Pro+ भारतात लॉन्च होण्यापूर्वी काळ्या रंगात छेडले गेले आहे

महत्वाचे मुद्दे
  • Redmi Note 14 series भारतामध्ये 9 डिसेंबरला लॉन्च होणार
  • Redmi Note 14 series मध्ये बेस मोड, प्रो आणि प्रो प्लस व्हेरिएंट चा समाव
  • Redmi Note 14 Pro+ हा स्मार्टफोन काळा आणि पर्पल रंगामध्ये उपलब्ध असेल
जाहिरात

Redmi Note 14 series भारतामध्ये 9 डिसेंबरला लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. चीन मध्ये तीन महिन्यांपूर्वी हा फोन लॉन्च झाला आहे. भारतामध्ये हा फोन लॉन्च होताना तीन मॉडेल्स सह येण्याचा अंदाज आहे. यामध्ये बेस मोड, प्रो आणि प्रो प्लस व्हेरिएंट असणार आहे. Xiaomi India कडून या फोनची झलक जारी करण्यापूर्वी Redmi Note 14 Pro+ च्या स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे. त्यामध्ये curved AMOLED screen आणि 50-megapixel camera असणार आहे. हे फीचर्स फोअनच्या चायनीज व्हेरिएंट प्रमाणे असणार आहेत.

Redmi Note 14 Pro+ ची स्पेसिफिकेशन्स काय?

Xiaomi India कडून Redmi Note 14 Pro+ साठी मायक्रोसाईट बनवण्यात आली आहे. त्यामध्ये स्पेसिफिकेशन्स देण्यात आली आहेत. या हॅन्डसेट मध्ये curved AMOLED screen असणार आहे तर Gorilla Glass Victus 2 असणार आहे. यामध्ये काळा आणि पर्पल रंग असणार आहे. या फोनला विगन लेदरचं फिनिशिंग असणार आहे.

फोन मधील कॅमेराचे फीचर्स पाहता, Redmi Note 14 Pro+ मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सेटअप असणार आहे. यामध्ये 50-megapixel telephoto camera असणार आहे. तर optical image stabilisation आहे. हा फोन IP68-rated असल्याने फोनचे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, फोनमध्ये 20 पेक्षा जास्त एआय फीचर्स आहेत. मात्र त्याचे तपशील अद्याप देण्यात आलेले नाहीत.

फोनच्या डिझाईनचा, स्पेसिफिकेशनचा विचार करता ते चीन मध्ये लॉन्च झालेल्या फोन प्रमाणेच आहेत.

Redmi Note 14 Pro+ ची चीन मधील स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

Redmi Note 14 Pro+ चीन मधील व्हेरिएंट हा 6.67-inch OLED screen आणि 120Hz refresh rate सह आहे. यामध्ये Qualcomm ची Snapdragon 7s Gen 3 chipset आहे. तर ती 16GB of RAM आणि 512GB onboard storage सह जोडलेली आहे.

फोनच्या कॅमेराचा विचार करता त्यामध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट आहे. तर 50-megapixel Light Hunter 900 primary sensor आहे. सोबत 50-megapixel telephoto lens आहे. 8-megapixel ultrawide camera आहे. या हॅन्ड्सेट मध्ये 20-megapixel OmniVision OV20B sensor आहे. त्याचा फायदा फ्रंट कॅमेराद्वारा सेल्फी साठी होणार आहे. या फोनमध्ये 6,200mAh battery आहे तर 90W fast charging support आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »