रिलायंस जिओ चा New Year धमाका, लॉन्च केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फ्री मिळणार 500GB डेटा

रिलायंस जिओ चा New Year धमाका, लॉन्च केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फ्री मिळणार 500GB डेटा

Photo Credit: Reliance

रिलायन्स जिओ न्यू इयर वेलकम प्लॅन 2025 चे फायदे 200 दिवस टिकतील

महत्वाचे मुद्दे
  • New Year Welcome Plan 2025 मध्ये अनलिमिटेड 5G डेटा सपोर्ट मिळणार
  • प्लॅन मध्ये 500GB of 4G dataकिंवा 2.5GB/day मिळणार
  • Jio च्या माहितीनुसार, प्लॅन विकत घेतल्यापासून 200 दिवस व्हॅलिड राहणार
जाहिरात

Reliance Jio कडून नवा प्रिपेड प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईसकॉल आणि एसएमएस सर्व्हिस मिळणार आहे. सोबतच ग्राहकांना सुमारे 2150 रूपयांचे अधिकचे फायदे देखील मिळणार आहेत. यामध्ये शॉपिंग वेबसाईट्स वर डिस्काऊंट्स, फूड डिलेव्हरी अ‍ॅप्स वर डिस्काऊंट मिळणार आहेत. तसेच काही फ्लाईट बुकिंग्स देखील डिस्काऊंट मिळणार आहेत. या प्लॅनची किंमत कंपनीने सुमारे 400 रूपयांपेक्षा अधिक ठरवली आहे. ज्या ग्राहकांना हा प्लॅन विकत घ्यायचा आहे त्यांना 11 जानेवारी 2025 पूर्वी हा रिचार्ज प्लॅन घ्यावा लागणार आहे.

Reliance Jio New Year Welcome Plan 2025 ची किंमत, व्हॅलिडिटी

Reliance Jio New Year Welcome Plan 2025 हा भारतामध्ये 2025 रूपये पासून उपलब्ध होणार आहे. या प्लॅनचे फायदे 200 दिवसांपर्यंत मिळणार आहेत तर Reliance Jio prepaid customers साठी हा प्लॅन 11 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान विकत घेण्याची संधी मिळणार आहे.

2025 रूपयांच्या रिचार्ज मध्ये रिलायंस जिओ कस्टमर्सना JioTV, JioCinema, आणि JioCloud subscriptions मिळणार आहे. याच्या माध्यमातून त्यांना 2150 रूपयांची कूपन्स मिळतील. यामध्ये 500 रूपयांच्या Ajio coupon चा देखील समावेश असेल. मात्र ते रिडीम करण्यासाठी 2500 रूपयांची खरेदी ई कॉमर्स वेबसाईट वर करावी लागणार आहे.

Reliance Jio New Year Welcome Plan सोबतच्या अन्य बेनिफिट्स मध्ये स्विगीच्या 499 रूपयांच्या खरेदीवर 150 रूपयांची सूट मिळणार आहे. EaseMyTrip.com वरून बुकिंग केल्यास फ्लाईट बुकिंग वर 1500 रूपयांची सूट मिळणार आहे.

Comments
पुढील वाचा: Reliance Jio, Reliance, New Year Welcome Plan 2025
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »