Samsung Galaxy Z Fold 6 Slim ची वैशिष्ट्ये आणि किंमत

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोन दक्षिण कोरियन स्मार्टफोन कंपनी Samsung कडून 25 सप्टेंबर 2024 रोजी दक्षिण कोरिया मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

Samsung Galaxy Z Fold 6 Slim ची वैशिष्ट्ये आणि किंमत

Photo Credit: Gadgets 360

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy Z Fold 6 Slim
  • हा स्मार्टफोन फक्त दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आह
  • सेल्फी कॅमेऱ्याच्या बाबतीत स्मार्टफोनला अपग्रेड मिळेल अशी शक्यता आहे.
जाहिरात

Samsung या स्मार्टफोन कंपनीच्या आगामी स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या उत्पादनाकडे चाहत्यांचे नेहमीच लक्ष असते. तसेच आता Samsung चा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy Z Fold 6 slim कंपनीकडून बनविण्यात येत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. त्याप्रमाणेच हा स्मार्टफोन कंपनीकडून सप्टेंबर महिन्यात दक्षिण कोरिया मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. लॉन्च झाल्यानंतर काही निवडक बाजारपेठांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चला तर मग बघूया अंदाजे काय असू शकतात या बुक स्टाईल फोल्डेबल स्मार्टफोनची वैशिष्ट्ये.

केव्हा लॉन्च होणार Samsung Galaxy Z Fold 6

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोन दक्षिण कोरियन स्मार्टफोन कंपनी Samsung कडून 25 सप्टेंबर 2024 रोजी दक्षिण कोरिया मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानंतर हा स्मार्टफोन चीन मध्ये सुद्धा लॉन्च करण्यात येईल. त्यामुळे सध्या तरी हा स्मार्टफोन फक्त या दोन बाजारपेठेतच खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. भारतासोबतच, UAE, UK आणि सिंगापूर मध्ये हा स्मार्टफोन केव्हा लॉन्च करण्यात येईल याबाबत कोणतीही स्पष्टता कंपनीकडून मिळालेली नाही आहे. यासोबतच आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनचे उत्पादन करताना कंपनीने उत्पादन संख्या ही मर्यादित ठेवली असून फक्त चार ते पाच लाख इतके स्मार्टफोन अद्याप बनविण्यात आले आहेत.

Samsung Galaxy Z Fold 6 ची वैशिष्ट्ये

Samsung चा स्मार्टफोन म्हटला की त्याचे सर्वांत पहिले वैशिष्टय म्हणजे त्याचा कॅमेरा. Samsung Galaxy Z Fold 6 या फोल्डेबल स्मार्टफोन मध्ये मागील बाजूस तीन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 12 मेगापिक्सलचा असून, 10 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 4 मेगापिक्सलचा कॅमेरा देखील देण्यात येणार आहे. सेल्फी काढण्यासाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूस 5 मेगापिक्सलचा कॅमेरा बसविण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy Z Fold 6 Slim फोल्डेबल स्मार्टफोन मध्ये टायटॅनियम बॅक पॅनल बसवलेला असू शकतो. या स्मार्टफोनच्या नावातच Slim म्हणजेच पातळ या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की Samsung च्या यापूर्वीच्या लॉन्च झालेल्या फोल्डेबल स्मार्टफोनपैकी हा सर्वांत पातळ असा स्मार्टफोन आहे, जो फोल्ड केल्यावर 11.5mm इतका आहे.

Samsung Galaxy Z Fold 6 Slim या स्मार्टफोनमध्ये 8 इंचाचा अंतर्गत डिस्प्ले आणि 6.5 इंचाचा बाह्य डिस्प्ले बसविण्यात आलेला असून Galaxy Z Fold च्या 7.6 इंचाच्या अंतर्गत आणि 6.3 इंच बाह्य डिस्प्लेच्या तुलनेत थोडी सुधारणा या स्मार्टफोनमध्ये नक्कीच अपेक्षित आहे. साऊथ कोरिया आणि चीनमध्ये हा स्मार्टफोन केव्हा लॉन्च होणार हे तर आपल्याला कळलेच आहे पण भारतामध्ये हा स्मार्टफोन कंपनीकडून केव्हा लॉन्च करण्यात येईल हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडून राहा.

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. प्रीती झिंटाने शेअर केला ‘बटवारा १९४७’मधील हमीदाचा पहिला लूक!
  2. सोनू निगमची कोट्यवधींची रिअल इस्टेट गुंतवणूक; अंधेरीत १ कोटींचे ऑफिस, भाड्यातून कोट्यवधींची कमाई
  3. रील्सच्या नादात वेळ कसा जातो कळतही नाही; शॉर्ट व्हिडीओच्या व्यसनामागचं संशोधन काय सांगतं?
  4. Rogbid VisionW स्मार्ट ग्लासेस लॉन्च; AI फीचर्ससह ऑफिसपासून आउटडोअरपर्यंत वापरता येणार, जाणून घ्या किंमत
  5. फोनची स्टोरेज वारंवार फुल होतेय? या ५ गोष्टी हटवताच मोकळी होईल जागा
  6. Google Pixel 11 Pro आणि Pro XL भारतात लॉन्च; 16GB RAM, 50MP कॅमेरा आणि दमदार AI फीचर्स
  7. Google Pixel Watch 5 भारतात लॉन्च; Health Guardian फीचर्ससह ४० तासांची बॅटरी
  8. Google Pixel Tag भारतात लॉन्च; ₹३,७९९ मध्ये हरवलेल्या वस्तू शोधणे होणार सोपे
  9. 'बिग बॉस २०'चा नवा ट्विस्ट! सलमान खानचा 'तथास्तु २' मंत्र; प्रोमोने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
  10. Flipkart Freedom Sale: Realme 16T 5G वर तब्बल ₹३,२५० पर्यंत सूट, खरेदीची मोठी संधी
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »