Photo Credit: Tecno
Tecno Camon 40 series लवकरच लॉन्च होण्याच्या तयारी मध्ये आहे. Camon 30 series च्या पुढील हा स्मार्टफोन आहे. दरम्यान Camon 30 series हा MWC 2024 मध्ये फेब्रुवारीत लॉन्च झाला आहे. Tecno Camon 30 series मध्ये बेस आणि प्रो मॉडेल्स आहे आणि हा फोन 4 जी, 5 जी मध्ये उपलब्ध आहे. लोकप्रिय बेंचमार्किंग वेबसाईट वर Camon 40 Pro 5G देखील स्पॉट झाले आहेत. या लिस्टिंग मध्ये फोनच्या चीपसेट, रॅम आणि ऑपरेटींग सिस्टीम चे तपशील आहेत.
Tecno Tecno CM7 या मॉडेल नंबर सह Geekbench वर फोन लिस्ट झाला आहे. Camon 40 Pro 5G चं पदार्पण होणार आहे. लिस्टिंगच्या माहितीनुसार, सिंगल आणि मल्टी स्कोअर 1,034 आणि 3,257 आहे.
EEC listing नुसार, Tecno Camon 40 Pro 5G आणि Camon 40 Premier 5G variants ला CM7 आणि CM8 हे मॉडेल नंबर दिलेले आहे.
Geekbench listing मध्ये Tecno Camon 40 Pro 5G यामध्ये octa-core chipset असण्याचा अंदाज आहे. यामध्ये 4 कोअर्स आहेत अशी माहिती 91Mobiles ने दिली आहे. Tecno Camon 30 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 chipset असणार आहे.
पूर्वीच्या एका अहवालात दावा केला होता की Tecno Camon 40 Pro 5G मॉडेल क्रमांक CM8 सह IMEI डेटाबेसवर लिस्ट झाला आहे. पूर्वी नमूद केलेल्या EEC सूचीवर विश्वास ठेवायचा असल्यास, ही Tecno Camon 40 Premier 5G version असण्याचा अंदाज आहे.
Tecno Camon 40 Pro चा 4जी व्हेरिएंट आणि बेस Camon 40 हा मॉडेल नंबर CM6 आणि CM5 सह येण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात