Tecno Pop 9 5G मध्ये octa core MediaTek Dimensity 6300 chipset, 48 मेगापिक्सेल रेअर कॅमेरा पहा अजून फीचर्स काय?

Tecno Pop 9 5G हा भारतामधील नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन पैकी एक आहे. त्याची सुरूवात 9,499 रूपयांपासून होणार आहे

Tecno Pop 9 5G मध्ये  octa core MediaTek Dimensity 6300 chipset,  48 मेगापिक्सेल रेअर कॅमेरा पहा अजून फीचर्स काय?

Photo Credit: Tecno

Tecno Pop 9 5G comes in Aurora Cloud, Azure Sky and Midnight Shadow shades

महत्वाचे मुद्दे
  • Tecno Pop 9 5G हा स्मार्टफोन Aurora Cloud मध्ये उपलब्ध होणार आहे
  • Tecno Pop 9 5G ची किंमत 4GB + 64GB या व्हेरिएंटची किंमत Rs. 9,499 आहे
  • Tecno Pop 9 5G मध्ये 48 मेगापिक्सेल रेअर कॅमेरा आहे
जाहिरात

Tecno आता भारतामध्ये अजून एक नवा स्मार्टफोन घेऊन येण्याच्या तयारी मध्ये आहे. Tecno चा हा आगामी फोन नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. Tecno Pop 9 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये मंगळवार 24 सप्टेंबरला लॉन्च झाला आहे. Transsion चा नवा बजेट स्मार्टफोन 48 मेगापिक्सेल रेअर कॅमेरा फोन आहे. या फोन मध्ये NFC support आहे. या स्मार्टफोनमध्ये octa core MediaTek Dimensity 6300 chipset आहे. कंपनीच्या माहितीनुसार, सध्या हा फोन प्री बुकिंग साठी खुला आहे. ऑक्टोबर मध्ये या फोनसाठी खरेदी सुरू होणार आहे. हा फोन Tecno Pop 8 चा पुढील फोन आहे. जो मागील वर्षी लॉन्च करण्यात आला होता.

Tecno Pop 9 5G ची भारतामध्ये किंमत काय?

Tecno Pop 9 5G ची किंमत 4GB + 64GB या व्हेरिएंटची किंमत Rs. 9,499 आहे. तर 4GB + 64GB व्हेरिएंट साठी जो 128GB storage variant चा स्मार्टफोन 9,999 रूपयांना मिळणार आहे. हा फोन सध्या अमेझॉनच्या माध्यमातून प्री बूकिंगसाठी उपलब्ध आहे. 7 ऑक्टोबर पासून त्याची विक्री होणार आहे.
e-commerce platform मध्ये खरेदी करताना कस्टमर्स हॅन्डसेटची प्री बुकिंग अवघ्या 499 रूपयांमध्ये करता येणार आहे. ही रक्कम Amazon Pay Balance मध्ये क्रेडिट होणार आहे.

Tecno Pop 9 5G हा स्मार्टफोन 3 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. Aurora Cloud, Azure Sky आणि Midnight Shadow मध्ये उपलब्ध असणार आहे. या हॅन्ड सेट मध्ये दोन complimentary phone skins मिळणार आहेत.

Tecno Pop 9 5G ची स्पेसिफिकेशन आणि फीचर्स काय?

Tecno Pop 9 5G मध्ये ड्युअल सीम आहेत त्यात दोन्ही नॅनो सीम कार्ड्स असतील. या स्मार्टफोन मध्ये LCD screen असेल आणि 120Hz refresh rate असणार आहे. तर MediaTek Dimensity 6300 SoC असणार आहे. या स्मार्टफोन मध्ये 4 जीबी रॅम असणार आहे आणि ऑनबोर्ड 128 जीबी स्टोरेज असणार आहे.

Tecno Pop 9 5G मध्ये 48 मेगा पिक्सेल Sony IMX582 rear camera sensor असणार आहे. तर LED flash असणार आहे. या स्मार्टफोन मध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. तर हॅन्डसेट मध्ये ड्युअल स्पीकर असणार आहेत जे Dolby Atmos आहेत.

Tecno Pop 9 5G मध्ये बॅटरी
5,000mAh ची असणार आहे. या स्मार्टफोनला 18W wired charging चा सपोर्ट असणार आहे. फोनमध्ये infrared (IR) transmitter आहे. IP54 rating असल्याने फोन डस्ट आणि splash resistance आहे. NFC support करणारा हा पहिला 5G phone आहे. या स्मार्टफोनची साईझ 165 x 77 x 8mm आहे. तर फोनचं वजन 189 ग्राम आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. 55dB ANC आणि 50 तास बॅटरीसह Realme Buds Air 8 Pro भारतात लॉन्च
  2. भारत लॉन्चपूर्वी Motorola Edge 70 Pro+ चे कॅमेरा, डिझाइन आणि रंग पर्याय समोर
  3. ‘सालबर्डी’ OTT रिलीज: पूजा सावंतचा मराठी क्राइम थ्रिलर आता प्राइम विडिओवर
  4. 'भागूबाई' OTT वर प्रदर्शित: हा मराठी विनोदी-नाट्यपट ऑनलाइन कसा पाहावा, ते जाणून घ्या.
  5. AMOLED डिस्प्ले, GPS आणि 20 दिवसांच्या बॅटरीसह भारतात Realme Watch S5 लॉन्च
  6. Realme 16T 5G भारतात लॉन्च; 50MP Sony कॅमेरा, 8,000mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्लेची साथ
  7. प्रीमियम डिझाइन आणि कॅमेरा फीचर्ससह Vivo S2 जुलैमध्ये भारतात लॉन्च होण्याची शक्यता
  8. 1.74-इंच AMOLED डिस्प्ले आणि 21 दिवसांच्या बॅटरीसह Xiaomi Smart Band 10 Pro लॉन्च
  9. Intel Core Ultra 7 प्रोसेसरसह Acer Aspire 5 AI लॅपटॉप भारतात लॉन्च; Copilot+ फीचर्सचा सपोर्ट
  10. Snapdragon 8 Gen 5 चिपसह Motorola Razr Fold भारतात विक्रीसाठी उपलब्ध; ट्रिपल 50MP कॅमेऱ्यांची साथ
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »