Vi-Vivo ची पार्टनरशीप; पहा vivo V50e घेणार्‍यांना काय मिळणार

प्लॅन अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी, यूजर्सना Vi प्रीपेड सिम फोनमध्ये वापरावे लागेल आणि 1197 च्या प्लॅनसह रिचार्ज करावे लागेल, जो 84 ४ दिवसांसाठी वैध असेल.

Vi-Vivo ची पार्टनरशीप; पहा vivo V50e घेणार्‍यांना काय मिळणार

Photo Credit: Vivo

Vivo V50e (चित्रात) एप्रिलमध्ये भारतात लाँच झाला होता

महत्वाचे मुद्दे
  • Vi कडून Vi 5G Content Bundle प्लॅनची किंमत 1197 रूपये
  • नवीन आणि सध्याचे असे दोन्ही प्रकारचे व्ही प्रीपेड युजर्स या ऑफरसाठी पात्र
  • हा एक्सक्लुझिव्ह प्लॅन 84 दिवसांसाठी वैध आहे
जाहिरात

Vi ने Vivo V50e 5G स्मार्टफोनसह एक विशेष bundled plan ऑफर करण्यासाठी Vivo सोबत भागीदारी केली आहे. या प्लॅनमध्ये Vi ची 5G कनेक्टिव्हिटी आणि Vi Movies & TV प्लॅटफॉर्मचे 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. Vivo V50e 5G खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना 30 जूनपर्यंत उपलब्ध आहे.ऑफर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी, यूजर्सना Vivo V50e स्मार्टफोनमध्ये Vi प्रीपेड सिम वापरावे लागेल आणि 84 दिवसांसाठी वैध असलेल्या 1,197 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करावे लागेल. पहिल्या 1197 रुपयांच्या रिचार्जनंतर Vi Movies & TV सबस्क्रिप्शनचे पहिले तीन महिने अ‍ॅक्टिव्ह केले जातात. उर्वरित 9 महिने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या रिचार्जनंतर (खरेदीच्या एका वर्षाच्या आत) तीन समान हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत.

Bundled Plan मध्ये काय मिळणार?

  • 12 महिन्यांचे Vi Movies आणि TV subscription
  • Disney+ Hotstar, ZEE5, Sony LIV, Lionsgate Play, Fancode यासह 17 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश
  • 350 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल चा अ‍ॅक्सेस
  • 3 जीबी दररोज डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिन

नवीन आणि सध्याचे असे दोन्ही प्रकारचे व्ही प्रीपेड युजर्स या ऑफरसाठी पात्र आहेत.bundled plan मुळे वर्षाला 3 हजार रूपयांपर्यंत बचत होते, ज्यामुळे integrated digital आणि entertainment experience घेता येणार आहे. Vi Movies आणि TV subscription हे Vi सबस्क्राइबर्ससाठी उपलब्ध असलेले कंटेंट प्लॅटफॉर्म आहे, जे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये क्युरेटेड पॅकद्वारे अनेक ओटीटी अॅप्स, लाइव्ह चॅनेल्स आणि कंटेंट लायब्ररीज ची सोय देणार आहे.

Vivo V50e ची स्पेसिफिकेशन्स

Vivo V50e मध्ये MediaTek Dimensity 7300 SoC, , 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5600mAh बॅटरी, 50 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा युनिट आणि 50 मेगापिक्सेल सेल्फी शूटरचा समावेश आहे. Android 15-based Funtouch OS 15 वर चालणारा हा स्मार्टफोन आहे. दरम्यान 8GB RAM + 128GB व्हेरिएंट Rs 28,999 आणि 8GB RAM + 256GB storage व्हेरिएंट Rs 30,999 मध्ये उपलब्ध आहे.

Vi ने Vivo सोबतची ही पार्टनरशीप मुंबई, दिल्ली, पटना आणि चंदीगड सारख्या शहरांमध्ये 5G रोलआउटस मध्ये मिळणार आहे. Vi ने ऑगस्ट 2025 पर्यंत देशातील 17 प्रायोरिटी सर्कल मध्ये 5G कनेक्टिव्हिटी विस्तारण्याची योजना आखली आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. प्रीती झिंटाने शेअर केला ‘बटवारा १९४७’मधील हमीदाचा पहिला लूक!
  2. सोनू निगमची कोट्यवधींची रिअल इस्टेट गुंतवणूक; अंधेरीत १ कोटींचे ऑफिस, भाड्यातून कोट्यवधींची कमाई
  3. रील्सच्या नादात वेळ कसा जातो कळतही नाही; शॉर्ट व्हिडीओच्या व्यसनामागचं संशोधन काय सांगतं?
  4. Rogbid VisionW स्मार्ट ग्लासेस लॉन्च; AI फीचर्ससह ऑफिसपासून आउटडोअरपर्यंत वापरता येणार, जाणून घ्या किंमत
  5. फोनची स्टोरेज वारंवार फुल होतेय? या ५ गोष्टी हटवताच मोकळी होईल जागा
  6. Google Pixel 11 Pro आणि Pro XL भारतात लॉन्च; 16GB RAM, 50MP कॅमेरा आणि दमदार AI फीचर्स
  7. Google Pixel Watch 5 भारतात लॉन्च; Health Guardian फीचर्ससह ४० तासांची बॅटरी
  8. Google Pixel Tag भारतात लॉन्च; ₹३,७९९ मध्ये हरवलेल्या वस्तू शोधणे होणार सोपे
  9. 'बिग बॉस २०'चा नवा ट्विस्ट! सलमान खानचा 'तथास्तु २' मंत्र; प्रोमोने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
  10. Flipkart Freedom Sale: Realme 16T 5G वर तब्बल ₹३,२५० पर्यंत सूट, खरेदीची मोठी संधी
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »