X200 FE हा S30 Pro Mini चा रि ब्रॅन्ड फोन असू शकतो, ज्यामध्ये जागतिक बाजारपेठेनुसार किरकोळ बदल करून तो पुन्हा उपलब्ध केलेला असेल.
Photo Credit: Vivo
Vivo X200 FE चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची पुष्टी झाली आहे
Vivo कडून compact flagship म्हणून अजून स्मार्टफोन बाजारात आणला जाणार आहे. Vivo X200 FE हा कंपनीचा आगामी किफायतशीर स्मार्टफोन आहे जो परवडणाऱ्या किमतीत विविध फ्लॅगशिप-ग्रेड फीचर्स सह येणार आहे. Vivo X200 FE लॉन्च कधी होणार? याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडीयामध्ये लीक झालेल्या काही माहितीनुसार त्याच्या वायब्रंड रंगांची, Zeiss tuned camera, वायब्रंड डिस्प्ले आणि पॉवरफूल परफॉर्मन्सची चर्चा सुरू झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, Vivo X200 FE जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात Vivo X Fold 5 सोबत लाँच होण्याची अपेक्षा आहे. ब्रँडने सध्या अधिकृत तारखा जाहीर केलेल्या नाहीत, परंतु येत्या काही दिवसांत त्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
Vivo X200 FE मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.31-इंचाचा 1.5K LTPO OLED पॅनेल असण्याची अपेक्षा आहे. अहवालांनुसार, यामध्ये MediaTek Dimensity 9300+ चिपसेट असू शकते आणि 12GB पर्यंत RAM आणि 512GB स्टोरेजसह येऊ शकते. यात 90W सपोर्टसह 6,500 mAh बॅटरी असू शकते. यामध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, आयआर ब्लास्टर आणि बर्याच फीचर्स सह हा फोन लॉन्च होण्याचा अंदाज आहे. फोनमध्ये IP68 किंवा IP69 रेटिंग असल्याने फोन धूळ, पाण्यापासून सुरक्षित असण्याचा अंदाज आहे.
फोन मधील कॅमेरा पाहता, या स्मार्टफोन मध्ये OIS सह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी शूटर, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर असेल. लीक झालेल्या रेंडर्सवरून असेही दिसून येते की या स्मार्टफोनमध्ये Zeiss ट्यून केलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. फ्रंटला, या मध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर मिळू शकतो.
Vivo X200 FE ची किंमत सुमारे 50 हजार ते 60 हजार रूपयांच्या रेंज मध्ये असण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन बाजारात OnePlus 13s, iQOO 13 आणि Realme GT 7 Pro ला टक्कर देईल असे म्हटले जाते.
Vivo X200 FE चार रंगांमध्ये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. ज्यात गुलाबी, पिवळा, काळा, निळा रंगाचा समावेश असू शकतो. दरम्यान Vivo X200 FE चं डिझाईन हे इतर X200 सीरीज मधील मॉडेल्सपेक्षा वेगळ असेल.
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹64,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
Vivo Buds Clip Launch Date Confirmed for September 21, Colour Options Revealed