Asus Pad मध्ये १२.२-इंचाचा २.८के OLED डिस्प्ले आहे.
Asus कंपनीकडून भारतात Asus Pad ची किंमत आणि उपलब्धतेची माहिती जाहीर केली आहे. Computex 2026 मध्ये सादर करण्यात आलेला हा Android टॅबलेट 6 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा टॅबलेट भारतात दोन RAM आणि स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. Asus Pad मध्ये MediaTek Dimensity 8300 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यात 9,000mAh बॅटरी आहे. यामध्ये 2.8K रिझोल्यूशनसह 12.2 इंचाचा डिस्प्ले मिळतो.
Asus Pad मध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 8300 चिपसेट देण्यात आला आहे. यात 8GB LPDDR5X RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळते. तसेच microSD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.
Asus Pad मध्ये 13 मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी Asus Pad मध्ये Wi-Fi 6E, Bluetooth 5.3 आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये Dolby Atmos 360-डिग्री सिनेमॅटिक ऑडिओ सपोर्टसह चार स्पीकर्स आहेत. तसेच यात accelerometer, ambient light sensor, gyroscope आणि hall sensor यांसारखे सेन्सर्स देण्यात आले आहेत.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy S26 FE Camera Specifications Leaked Ahead of Expected Launch, May Reuse Its Predecessor's Main Rear Camera