मोबाईलवर वारंवार कॉल ड्रॉप होणे, आवाज तुटणे किंवा नेटवर्कची समस्या येत असेल, तर आता ग्राहकांना थेट तक्रार नोंदवण्याची सुविधा मिळाली आहे.
कॉल ड्रॉपचा त्रास? आता थेट TRAI कडे करा तक्रार; नव्या MyCall अॅपमुळे नेटवर्क समस्यांवर ठेवता येणार नजर
भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (TRAI) ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी TRAI MyCall अॅपची नवीन आवृत्ती सादर केली आहे. भारतातील १०० कोटींहून अधिक दूरसंचार ग्राहकांना त्यांच्या कॉलिंग आणि नेटवर्क सेवांबाबतचा अनुभव थेट दूरसंचार कंपन्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे. कॉलिंग ही सर्वाधिक वापरली जाणारी सेवा असल्याने कॉल ड्रॉप होणे, कॉल अचानक तुटणे किंवा नेटवर्कमध्ये अडथळे निर्माण होणे अशा समस्यांची तक्रार आता या अॅपद्वारे सहज करता येणार आहे.
TRAI MyCall अॅपची उपलब्धता
सध्या TRAI MyCall अॅप केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असून ते Google Play Store वरून डाउनलोड करता येते. हे अॅप iOS साठी कधी उपलब्ध होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
वापरकर्त्यांना काय फायदा होणार?
या अॅपच्या माध्यमातून वापरकर्ते कॉल ड्रॉप, नेटवर्कमधील अडथळे किंवा कॉलच्या गुणवत्तेबाबत रेटिंग आणि अभिप्राय देऊ शकतात. प्रत्येक कॉलनंतर स्क्रीनवर एक पॉप-अप दिसतो, ज्याद्वारे कॉलचा अनुभव लगेच नोंदवता येतो. विशेष म्हणजे, वापरकर्त्यांचा अभिप्राय आणि वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते.
अॅपचा वापर कसा कराल?
TRAI MyCall सध्या फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि ते Google Play Store वरून डाउनलोड करता येते.
अॅप डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर आवश्यक परवानग्या (Permissions) द्याव्या लागतात आणि अटी व शर्ती स्वीकाराव्या लागतात.
प्रत्येक कॉलनंतर स्क्रीनवर पॉप-अप दिसण्यासाठीही काही परवानग्या आवश्यक असतात.
त्यानंतर कॉल ड्रॉप, नेटवर्कमधील बिघाड किंवा कॉलिंगशी संबंधित कोणतीही समस्या थेट TRAI आणि संबंधित दूरसंचार कंपनीपर्यंत पोहोचवता येते.
या सुविधेमुळे ग्राहकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे नेटवर्क सेवा अधिक सक्षम करण्यास आणि तांत्रिक अडचणी कमी करण्यास दूरसंचार कंपन्या आणि TRAI यांना मदत होणार आहे.
TRAI MyCall अॅपमधून काय करता येईल?
जाहिरात
जाहिरात
Leak Suggests Grand Theft Auto 6's Extended Look on Netflix Could Have 3 Episodes