नुकतेच, कंपनीने आयक्यूब (iQube) इलेक्ट्रिक स्कूटरच्या १० लाख युनिट्स उत्पादनाचा टप्पा ओलांडला आहे.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या बाजारात मोठे शेअर्स असलेले TVS Motor ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किमतीत वाढ केली आहे. TVS Motor च्या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये iQube आणि Orbiter यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या विक्रीत वेगाने वाढ होत आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, TVS Motor च्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या 3.5 kWh बॅटरी असलेल्या व्हेरिएंटची किंमतीत सर्वाधिक 9,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.33 लाख रुपयांवरून 1.42 लाख रुपये झाली आहे. iQube च्या 2.2 kWh बॅटरी असलेल्या व्हेरिएंटची किंमत 5,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. किंमत 1.11 लाख रुपयांवरून 1.16 लाख रुपये झाली आहे.TVS Motor इलेक्ट्रिक स्कूटरच्या 4.7 kWh व्हेरिएंटची किमत 6,000 रुपयांने वाढ झाली आहे. त्याची किंमत 1.55 लाख रुपयांवरून 1.61 लाख रुपये झाली आहे. TVS Motor च्या सर्वाधिक रेंज असलेल्या iQube ST ची किंमत 3,000 रुपयांने वाढ करण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 5.3 kWh बॅटरी देण्यात आली आहे. स्कूटरची किंमत आता 1.75 लाख रुपये इतकी आहे. मात्र, कंपनीने iQube च्या 3.1 kWh बॅटरी असलेल्या व्हेरिएंटच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही.
अलीकडेच कंपनीने iQube च्या 10 लाख युनिट्सच्या उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये याचा समावेश होतो. TVS Motor च्या पोर्टफोलिओमध्ये Orbiter इलेक्ट्रिक स्कूटरचाही समावेश आहे. नुकतेच कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (BaaS) हा पर्याय सुरू केला आहे. BaaS पर्याय निवडल्यास इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत कमी होते आणि कंपनीकडून ग्राहकांना दीर्घकालीन बॅटरी अॅश्युरन्सही दिली जाते. मात्र, यामध्ये बॅटरीसाठी स्वतंत्र भाडे (रेंटल) द्यावे लागते. TVS Motor ने Orbiter V1 ची किंमत 3,700 रुपयांनी वाढवली आहे. तसेच Orbiter V2 च्या किमतीत 3,900 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या बाजारात TVS Motor ने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. कंपनीने इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या 52,538 युनिट्सची विक्री केली आहे. या बाजारात TVS Motor चा हिस्सा 27.15 टक्के आहे. कंपनीच्या विक्रीत महिन्यानुसार 10.8 टक्के इतकी वाढ झाली आहे.
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹62,479
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹36,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
Free Fire India Launch Date Set for October 28; Confirmed to Feature Parental Controls, Playtime Limits