रिलायन्स जिओने आपल्या 49 व्या AGM मध्ये ‘Jio AI Call Agent’ ची घोषणा
Jio AI Call Agent हे कंपनीचे नवीन AI टूल असेल, जे कॉल सुरू असताना काम करेल. म्हणजेच, तुम्ही एखाद्याशी फोनवर बोलत असताना अचानक अन्न ऑर्डर करायचे आहे किंवा कॅब बुक करायची असल्यास, तर फक्त आवाजाच्या आदेशाने हा AI एजंट ते काम क्षणार्धात करून देईल. वापरकर्त्याला कॉलदरम्यान फक्त “Hey Jio” म्हणावे लागेल आणि हा AI सहाय्यक सक्रिय होईल. त्यानंतर कॉलची समरी तयार करणे, त्याचे ट्रान्सक्रिप्शन करणे किंवा इतर कोणतीही कमांड देणे शक्य होईल. फक्त एका आवाजाच्या आदेशावर तो अनेक प्रकारची कामे करू शकेल.
Jio AI Call Agent कसा काम करेल?
Jio AI Call Agent वापरण्यासाठी कोणत्याही थर्ड-पार्टी अॅपची गरज भासणार नाही. तो थेट जिओच्या नेटवर्कमध्ये एकत्रित (इंटिग्रेटेड) असेल. वापरकर्ता इच्छेनुसार तो सक्रिय करू शकतो किंवा नको असल्यास बंद ठेवू शकतो. हा AI एजंट पूर्णपणे मोफत असेल आणि त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. वापरकर्त्याच्या परवानगीने तो कॉलदरम्यान रिअल-टाइममध्ये संभाषणाचे ट्रान्सक्रिप्शन करणे, मीटिंग शेड्यूल करणे यांसारखी अनेक कामे करू शकेल.
Jio AI Call Agent कधी वापरता येईल?
कंपनीच्या माहितीनुसार, Jio AI Call Agent यावर्षाअखेरीस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केला जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) थेट सामान्य लोकांच्या दैनंदिन फोन कॉलमध्ये आणण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. कंपनीने सांगितले आहे की हा AI एजंट पूर्णपणे ‘Made in India' आहे आणि तो सर्व प्रमुख भारतीय भाषांना सपोर्ट करेल. त्यामुळे गाव असो वा शहर, हा AI एजंट प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणार आहे. म्हणजेच, तुम्ही फोनवर कोणाशीही बोलत असाल, तर फक्त “Hey Jio” म्हणा आणि तुमचे काम होईल. विशेष म्हणजे, हा AI एजंट एकाच वेळी 10 वेगवेगळ्या व्यक्तींचे आवाज ओळखू शकतो आणि कोणत्या व्यक्तीने काय बोलले याची नोंदही ठेवू शकतो.
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹64,150
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
TRAI Mandates Shorter Voice, SMS-Only Recharge Plans With Lower Tariffs
Lava Virat Power Reportedly Spotted on IMEI Database, Launch Seems Imminent
OnePlus 16 Confirmed to Feature Snapdragon 8 Elite Extreme Gen 6 SoC; a New Gaming Phone for India in Works